LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांचे पथकाची अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई



पंढरपूर/ प्रतिनिधी:-
आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह रोंगे, पोह हेंबाडे, पोकाँ हुलजंती व पोलीस नाईक शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबे येथील नदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता वैभव नागणे याच्या वाळू रॅम्पवर दोन टिप्परमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी अंदाजे 100 ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

कारवाई दरम्यान पोलीस पथकाने जेसीबी मशीन थांबविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जेसीबी चालक तसेच एका यारी ट्रॅक्टर चालकाने पोलीस पथकास पाहून वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेली वाहने ताब्यात घेतली असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .

1) टिप्पर क्रमांक BR 02 GA 3189
चालक – गणेश गांडुळे
मालक - प्रकाश गायकवाड
2) टिप्पर क्रमांक उपलब्ध नाही
चालक – सिद्धू लाला कांबळे
तसेच घटनास्थळावरून पळून गेलेल्या जेसीबीचा मालक नागेश आसबे, रा. गोपालपूर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाकडून पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments