दिनांक ३०/०५/२०२६ रोजी रात्रौ ०७:४५ वा. मा. श्री. प्रशांत डगळे (भा.पो.से.) सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर हे त्यांचे पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना पंढरपूर शहरातील भाजी मार्केटजवळील कृष्णाचे हौदाजवळ आले असताना, सदर ठिकाणी वेगवेगळया दोन स्कुटी मोटारसायकलवर दोन इसम पांढऱ्या रंगाचे पिशवीमध्ये सुपारी मिक्स प्रतिबंधित सुगंधित तंबाखु असलेला मावा विकताना दिसले. त्या दोघांपैकी एकजण पोलीसांना पाहून स्कुटी मोटारसायकल तिथेच सोडून माव्याची पिशवी घेवून पळून गेला. मिळून आलेल्या इसमाकडील पांढरी पिशवीमध्ये काय आहे? असे त्यास विचारता, त्याने त्यामध्ये मावा असून आणि त्याचे नाव इमरान शौकत तांबोळी रा. रोहीदास चौक, पंढरपूर असे असल्याचे सांगितले. पळून गेलेल्या इसमाबाबत चौकशी करता, त्याचे नाव सुरज रजपूत असे असल्याचे सांगितले. अशा प्रकारे आरोपी इमरान शौकत तांबोळी याचे कब्जात एक पांढरे पिशवीत सुगंधित तंबाखु मिश्रीत मावा व एक स्कुटी मोटारसायकल आणि आरोपी सुरज रजपूत याचे कब्जातील स्कुटी मोटारसायकल असा एकुण १,१२,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आलेने सदरचा मुद्देमाल ताब्यात घेवून अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळविले. त्याप्रमाणे वरील आरोपींविरूध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i), २६(२) (ii),२६(२) (iv) सह वाचन कलम २७ (३) (E), ३० (२) (A) व शिक्षा पात्र कलम ५९ आणि भारतीय न्याय संहीता कलम २२३, २७४, २७५ व १२३ चे उल्लंघन केल्याने चन्नवीर राजशेखर स्वामी, अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, म.राज्य सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई मा. श्री प्रशांत डगळे साो, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोसई गोसावी, सपोफौ कदम, पोकों वैभव घायाळ, पोकों टिंगरे, पोकॉ कदम, पोकॉ खटकाळे यांनी पार पाडलेली आहे.

0 Comments