अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील अवैध रित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर लक्ष ठेवुन योग्य ती कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना व सुचना देवुन आदेशीत केले होते.
सदर आदेशाच्या अनुषंगाने संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधीकारी व अंमलदार यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयात अवैध रित्या शस्त्र बाळगणा-यांचे शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, हातीद येथे सांगोला ते मिरज जाणारे महमार्गाचे ब्रिज येथे तीन इसम स्वतः जवळ अवैधरित्या पिस्टल बाळगुन उभेआहेत. सदरची माहिती पोनि जगताप यांनी मंगळवेढा उपविभागात पेट्रोलिंग करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेडील सपोनि अमित बाबर, सपोनि विजय शिंदे व त्यांच्या पथकांस सदर इसमांना ताब्यात घेवुन योग्य ती कारवाई करणेबाबतचे आदेश दिला.
सदर प्राप्त बातमीच्या ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, सपोनि विजय शिंदेव त्यांचे पथक हे पोहोचुन हातीद गावाच्या येथे सांगोला ते मिरज जाणारे महामार्गाचे ब्रिजखाली उभे असलेलेतिन्ही इसमांचासंशय आल्याने नमुद पथकाने त्यांनाताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नांवे 1) अवधूत सुभाश कैगार, वय 27 वर्षों, रा. कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर 2) हर्शवधर्न उर्फ बालाजी नामदेव ऐवळे, वय 24 वर्षों, रा. किडेभीसरी ता. सांगोला, जि. सोलापूर 3) आबा धोंडीराम नरळे, वय 29 वर्षों, रा. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर असे सांगितले. नमुद इसमांची अंगझडती घेतली असता यातील इसम क्र. 1) अवधूत केंगार याच्या कंबरेच्या डाव्याबाजुस पॅन्टीत खोचलेली एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व पॅन्टच्या उजव्या खिशातुन 02 जिवंत काडतुस व मोबाईल मिळून आले. व इसम क्र. 2) हर्शवर्धन उर्फ बालाजी ऐवळे याच्या कंबरेला डाव्या बाजूस पॅन्टीत खोचलेली एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह व पॅन्टच्या उजव्या खिशातून 02 जिवंत काडतूसे व पॅन्टच्या डाव्या खिशामध्ये मोबाईल, इत्यादी वस्तू मिळून आले.
सदर इसमांकडे देशी बनावटीचे पिस्टल वापराबाबत परवाना विचारले असता उडवा उडवीचे उत्तर देवु लागले. आरोपी याचेकडे अधीक विश्वासात घेवुन तपास करता सदरचे 2 देशी बनावटी पिस्टल व 4 जिवंत काडतुसहे महेबुब रा. मध्यप्रदेश याचेकडुन 2 वर्षापुर्वी घेतल्याचे सांगितले. सदर आरोपी विरुद्ध सांगोला पोलीस ठाणे गुरनं 623/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधीनियम 1959 चे कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केला असता मा. न्यायालयांनी 1 दिवसाची पोलास कोठडी मंजुर केली आहे. पोलीस कोठडी दरम्यानसपोनि / विजय शिंदे यांनी तपासा दरम्यान इसम नामे दिलीप शिवाजी अलदर वय-46 वर्षे रा. मदने वस्ती कोळे ता. सांगोला जि. सोलापूरयास ताब्यात घेवुन याचेकडुन 01 देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत काडतुस, 1 मोबाईल असे एकूण 60,400/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयात एकुण जप्त मुद्देमाल 3 देशी बनावटी पिस्टल व 6 जिवंत काडतुस, 4 मोबाईल असा एकुण 2,46,200/- रु किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि विजय शौदे स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहे.
नमुद उल्लेखनीय कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, सपोनि विजय शिंदे, व पथकातील पोहेकॉ सलीम बागवान, दशरथ गोरे, अतुल घाडगे, रवि माने, विरेश कलशेट्टी, व्यंकटेश मोरे, मपोहवा दिपाली जाधव, पल्लवी इंगळे, आश्वीनी गोटे, सुनंदा झळके, पोना जगदिश राठोड, पोकों अन्वर अत्तार, सुरज रामगुडे, मनोज राठोड, शिवलिंग स्वामी, चापोकों सुनिल पवार, आशुतोष जाधवतसेच सांगोला पोलीस ठाणेकडील पोउपनि सागर पाटील, पोहवा कोष्टी यांनी बाजवली आहे.

0 Comments