पंढरपूर, दि. २४: राष्ट्रीय आयुष वारी ... विठ्ठल रुख्माईच्या चरणी .. हा सामाजिक संदेश घेऊन आयुष मंत्रालयाच्या वतीने पंढरपूर येथे भक्तांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी “आयुष सेवा सुविधा केंद्र” उभारण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष मंत्रालयाची सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळावी तसेच ग्रामीण भागातही आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व्हावा, प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ वारकऱ्यांना मिळावा या दृष्टीकोनातून केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्या वतीने विठुरायाच्या चरणी आयुष सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता.
त्यानुसार राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत “आयुष सेवा सुविधा केंद्र” आषाढी वारीनिमित्त २४ ते २६ जुलै या कालावधीसाठी उभारण्यात आले आहेत. पंढरपुरात तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिर, चंद्रभागेच्या तिरावर

0 Comments