LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वाहून जाणारे पावसाचे पाणी आवताडेंच्या मागणीनुसार म्हैसाळ योजनेला सोडले, मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला दिलासा मंगळवेढा




 कृष्णा, पंचगंगा नदीचे पावसाच्या पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सोडून मंगळवेढा तालुक्याचे जलसंकट दूर करणेबाबत आ समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली होती त्या मागणीची दखल घेऊन म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोडले असून याचा मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाला मोठा फायदा होणार आहे.
आ आवताडे यांनी मागणी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आगामी दिवसात पावसाचा जोर वाढल्यास सदर नदीपात्रात पूर, महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यात आहे. सोलापूर जिल्ह्यात तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अद्यापही पावसाने ओढ दिली असून पेरणी करण्यास अनुकूल स्थिती अद्यापही नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी पाणी आणि पेरणी या दोन्हीपासून संकटात सापडला आहे.
दरम्यान सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदीतील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका १ आणि २ तसेच उमदी वितरिका लगत असलेल्या गावातील नागरिकांना पिण्याचे तसेच शेतीसाठी (जनावरांना) दिल्यास या भागातील गावांवर असलेले जलसंकट टळेल.गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात मध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी एक थेंबही मिळालेले नाही सध्या हे कालवे कोरड्या अवस्थेत असून कृष्णा व पंचगंगा नदीतील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी या कालव्यात सोडल्यास मोठा दिलासा या भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना मिळेल.
तरी, मी आपणास विनंती करतो की, कृष्णा, पंचगंगा नदीचे पावसामुळे पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका १ आणि २, तसेच उमदी वितरिका कालव्यात सोडण्याबाबत संबंधितांना आदेश करावे, अशी मागणी आ आवताडे यांनी केली होती याची दखल घेत म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता मासाळ यांनी सांगितले .




चौकट 

निरा भाटघर (NRBC) चे पाणीही पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कॅनलद्वारे मिळणार 

 वीर धरणाच्या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे निरा भाटघर धरणाच्या पाणी पातळी साठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे 6000 क्यूसेक पाणी निरा नदीत सोडले आणि ते पाणी निरा नरसिंगपूर येथून भीमा नदीमध्ये मिळणार असून ते पाणी सोलापूर च्या खाली कर्नाटक भागामध्ये जाणार आहे. भीमा नदीच्या काटचे जे शेतकरी आहेत त्यांना शेतीपंपासाठी 2 तास लाईट ठेवल्यामुळे पाईपलाईन सुद्धा भरत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्या ठिकाणी 8 तास विजपुरवठा करण्याची मागणी केली असून ती ही मागणी मान्य केली असून दोन दिवसात आठ तास विजपुरवठा होणार आहेत त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील कॅनॉलच्या लाभ क्षेत्रातील गावांना वीर धरण भरत आल्यामुळे शेतीला पाणी सोडण्यात यावे, या भागामध्ये पाऊस अजिबात नसल्यामुळे शेतकरी हवालदील झालेला असून पंढरपूर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांना तात्काळ कॅनलद्वारे पाणी सोडण्यात यावे.अशी मागणी आ आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती त्याप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील कॅनॉल मध्येही पाणी सोडण्यात आले असल्याचे सांगितले 


फोटो - आ आवताडे

Post a Comment

0 Comments