LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबर २०२६पासून ऑनलाईन नोंदणी,**दि. ०१ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर २०२६ मधील पुजांची होणार नोंदणी,*




पंढरपूर (ता.२६) - 
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत असून ०१ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीतील तुळशी अर्चन पुजेची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात *दि. २७ सप्टेंबर रोजी स.११.००* पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
या पूजेसाठी रुपये २१००/- इतके देणगी मूल्य आहे. ०१ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर २०२६  या कालावधीतील गर्दीचे व सण- उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. 
ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments