🛑 *स्मार्ट मीटरच्या वाढीव वीजबिलांविरोधात खासदार प्रणितीताई शिंदे आक्रमक; सोलापुरात स्वाक्षरी मोहीम*
👉 *सोलापूरकरांचा तीव्र विरोध असतानाही स्मार्ट मीटर योजना लादण्याचा प्रयत्न; सर्वसामान्य वीज ग्राहकांची लूट सुरू, जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून लढणार – खासदार प्रणितीताई शिंदे*
भाजप महायुती सरकारकडून सोलापूर शहर जिल्ह्यात नवीन स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक नागरिकांच्या वीजबिलांमध्ये अवाढव्य वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वीज वापरामध्ये मोठा बदल नसतानाही अचानक वाढीव बिले येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने सत्तर फूट रोड भाजी मार्केट चौक येथे स्मार्ट मीटरविरोधात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविणे, वाढीव वीजबिलांच्या तक्रारी आणि त्यातून सर्वसामान्य ग्राहकांवर पडणारा आर्थिक भार या प्रश्नांकडे भाजप महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनिर्मित महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय सोलापूरकरांना दिलासा देण्याऐवजी या जनविरोधी भाजप महायुती सरकारने वीजदरवाढीचा भार सोसायला भाग पाडले आहे. सोलापूरकरांचा तीव्र विरोध असूनही भाजप महायुती सरकार आपल्या व्यावसायिक मित्रांच्या स्वार्थासाठी वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर योजना लादू पाहत आहे. या योजनेमुळे अत्यावश्यक असलेले वीज क्षेत्र खासगी क्षेत्राच्या हाती जाण्याचा धोका असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य वीज ग्राहकांवर होऊ शकतो. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आम्ही संसदेत आणि रस्त्यावर उतरून जनतेची लढाई लढू, असेही प्रणितीताई शिंदे यांनी स्पष्ट केले.
महावितरणमार्फत राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून, अनेक ठिकाणी ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. तसेच स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत अवाढव्य वीजबिले येत असल्याच्या तक्रारीही सातत्याने प्राप्त होत आहेत. वीज बिलांमध्ये होणाऱ्या वाढीचा गरीब, शेतकरी, कामगार, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक, लघु व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार पडत असल्याने स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली ही लूट तातडीने थांबवावे. नवीन स्मार्ट मीटर बसविणे बंद करावे. अशी मागणी या स्वाक्षरी मोहिमेतून करत आहोत.
या स्वाक्षरी मोहिमेचे नियोजन मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला आणि सहकाऱ्यांनी केले होते.
या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत नवीन स्मार्ट मीटर लावणे बंद करावे आणि वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर आपल्या स्वाक्षऱ्या नोंदवल्या.
या स्वाक्षरी मोहिमेत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवा नेत्या प्रतीक्षाताई निकाळजे, अयाज आळंद, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, माजी नगरसेवक रमेश कैरमकोंडा, प्रकाश गेंट्याल, शिवशंकर अंजनाळकर, वाहिद बिजापूरे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, व्यंकटेश बोम्मेन, प्रशांत रायचूरकर, विवेक कन्ना, नागेश म्याकल, रमेश कुंचीकोर्वे, संघमित्रा चौधरी, करीमुनिसा बागवान, पूजाताई चव्हाण, छायाताई हिरवटे, मुमताज तांबोळी, अंबादास नडगिरी, गुरु बुरकुले, सागर उबाळे, रेखा बिनेकर, गिरीधर थोरात, सतीश संगा, उमर मुकेरी, पवन सग्गम, व्यंकटेश कोक्कुल, लक्ष्मण पडुरे, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, स्वप्नील पवार, दशरथ सामल, दफेदार भैय्या, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments