पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे व पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्मिताताई योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ पांडुरंग परिवार व परिचारक समर्थक पंढरपूर तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक व पदवीधर मतदार व मुख्याध्यापक यांची सहविचारी सभा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत (मालक) परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट कमिटी सभागृहामध्ये पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी निरीक्षक माजी आमदार कुंदन पाटील साहेब त्याचबरोबर मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाषराव माने सर, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अँड. वामनराव माने सर मार्केट कमिटीचे चेअरमन हरीष दादा गायकवाड, व्हॉइस चेअरमन राजू बापू गावडे त्याचबरोबर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व परिचारक प्रेमी व पांडुरंग प्रेमी सर्व मतदार बंधू भगिनीनीं भाजपा व महायुतीचे दोन्ही उमेदवारांना आपले पसंती क्रमांक एकचे मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला.
0 Comments