LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

⬛ *भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ पाळत सोलापूर शहर काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध; ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर सवाल, लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार*



सोलापूर : दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६

वोटचोरी बाबत, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खर्गेजी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीचे खासदार शांततेच्या मार्गाने जंतर-मंतरकडे जात असताना विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंकाजी गांधी, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह शेकडो खासदारांना मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांकडून अटक करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसच्या आवाहनानुसार ८ ऑक्टोबर २०२६ हा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला.

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनेही शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली ‘काळा दिवस’ पाळत मोदी सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवणारे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह शेकडो विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना रोखणे, त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करणे आणि महिला खासदारांशी धक्काबुक्की करणे ही लोकशाहीसाठी निषेधार्ह बाब आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही चेतनभाऊ नरोटे यांनी तीव्र सवाल उपस्थित केला. मतदार याद्यांमधील अनियमितता, पात्र मतदारांची नावे वगळली जाणे, मतदारसंघनिहाय मतदारसंख्येतील बदल तसेच निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीबाबत देशभरातून प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणून जनतेच्या मनातील शंका दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाची टक्केवारी आणि मतदारसंख्येबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत असले पाहिजे आणि एकाही मतदाराचा मतदानाचा अधिकार हिरावला जाऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे नरोटे यांनी स्पष्ट केले.

चेतनभाऊ नरोटे म्हणाले, “नोटबंदीच्या काळात जनतेला रांगेत उभे राहावे लागले, गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहावे लागले आणि आता स्वतःचा मतदानाचा अधिकार टिकवण्यासाठीही जनतेला रांगेत उभे राहावे लागत आहे. हे कसले सरकार आहे?”
“Gen Z आता जागा झाला आहे. देशातील तरुणाई आणि जनता आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी जागरूक झाली आहे. मतदार हा लोकशाहीचा खरा मालक आहे. त्याच्या मतावर कोणाचाही डल्ला पडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, राहुलजी गांधींसारख्या संवैधानिक पदावरील लोकप्रतिनिधींना ताब्यात घेणे, प्रियंकाजी गांधी यांच्यासह महिला खासदारांना धक्काबुक्की करणे आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करणे ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. काँग्रेस आणि INDIA आघाडी संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणार आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाही संपवण्याचे कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. संविधान, मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील. जनतेचा आवाज दाबता येणार नाही. मताचा अधिकार वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरूच राहील, असा निर्धार चेतनभाऊ नरोटे यांनी व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर अरिफ शेख, नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, रोजगार व बेरोजगार विभाग अध्यक्ष रुपेश गायकवाड, यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, विचार सेल अध्यक्ष अॅड. करीमुन्निसा बागवान, व्यापार व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, ब्लॉक अध्यक्ष शिवशंकर आंजनाळकर, परशुराम सतारेवाले, एन. के. मुल्ला, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, हाजी मैनुद्दीन शेख, राजन कामत, प्रा. सिद्राम सलवदे, रमेश फुले, बाबू विटे, नागेश म्याकल, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, मोहसीन फुलारी, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, छाया हिरवटे, नूरअहमद नलवार, ऐजाज बागवान, धीरज खंधारे, राम चिगरल्लू, दिनेश डोंगरे, सचिन पवार, महेंद्र शिंदे, अस्लम शेख, दशरथ सामल, शिवाजी साळुंखे, आनंद मोरे, सुनील डोळसे, प्रकाश कवडे, केतन कांबळे, आप्पा सलगर, शुकुर शेख, अभिलाष अच्युगटला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  ▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments