पंढरपूर(प्रतिनिधी):-
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सुचना तसेच आदेश दिले होते.
या आदेशाच्या अनुषंगाने संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेकडील तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, भाररी पथक तसेच सोलापूर विभाग यांचेकडील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे आज दि. ७/१०/२०२६ रोजी मौजे मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर आहे. सदर
कारवाईदरम्यान घटनास्थळी अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चा माल, चुल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गुळ-मिश्रीत रसायन, तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण अंदाजे ₹ ५,४१,३००/- (पाच लाख एकेचाळीस हजार तीनशे) रु. किमतीचा मुद्देमाल आढळून आला. विशेष बाब म्हणजे सदर अवैध साहित्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, अवैध हातभट्टी निर्मितीचे ठिकाण पूर्णपणे उद्धवस्त करण्यासाठी J.C.B. मशीनच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे व साहित्य नष्ट करण्यात आले. अवैध हातभटी तयार करण्याच्या उददेशाने साहित्य बाळगल्याबाबत ०४ सराईत हातभटटी व्यवसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन राज्य उत्पादन शुल्क विभागा यांच्या कार्यालयास देखील कारवाई चालु आहे.
अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणारऱ्यां विरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही व त्यांच्या विरूध्द हददपार, एम.पी.डी.ए. सारखी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी ही अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, विजय कबाडे अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली, संजय जगताप व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील जगन्नाथ पाटील, निरीक्षक अ विभाग, श्री अविनाश घाटगे, निरीक्षक ब विभाग, शिवकुमार कांबळे, प्रभारी निरीक्षक, भरारी पथक क्र ०१, तसेच स.पो.नि. विजय शिंदे, स.पो.नि. संजय राठोड, स.पो.नि. विशाल मुळे, स.पो.नि. बालाजी कांबळे, ग्र. पो.स.ई ख्वाजा मुजावार, पोहेकॉ देवकर व इतर पुरूष व महिला अंमलदार ने. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील उपनिरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, धनाजी पवार, सचिन शिंदे, विकास थोरात, महिला व पुरष जवान यांच्या पथकाने संयुक्तरित्या कामगीरी केली आहे.

0 Comments