अक्कलकोट– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया कांही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ज्ञानयात्री म्हणून ओळख झालेले स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांशी सुरवातीपासून संवाद साधत असून आज त्यांच्या अर्धांगिनी सौ. प्रेमलता रोंगे यांनी अक्कलकोट तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना भेटी देवून शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु झाली तेंव्हापासून डॉ. बी.पी. रोंगे हे शिक्षकांच्या संपर्कात असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांनी डॉ. रोंगे सरांना आमदार म्हणून पाहण्याचे पक्के केले आहे त्यामुळे डॉ.रोंगे सरांच्या प्रत्येक भेटीला जत्रेचे स्वरूप लाभत आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या करिअर प्रमाणे या तालुक्यात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे देखील भविष्य उज्वल झाले पाहिजे या भावनेतून शिक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. डॉ.रोंगे सरांच्या मदतीला काल कन्या प्रा. पूजा रोंगे तर आज त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रेमलता रोंगे ह्या मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी डॉ. रोंगे सरांसोबतच्या शिक्षकांच्या गर्दीत भर पडत आहे. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर हे गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महीन्यापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेट देऊन परिसर पिंजून काढत आहेत आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या निमित्ताने अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे स्वागत केले जात आहे. या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात आघाडी घेतली आहे, हे स्पष्ट होते. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. बी.पी.रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे. डॉ. रोंगे सरांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणीपासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रियाबाबत डॉ. रोंगे सर हे प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भेट घेवून चर्चा करत आहेत. सरांच्या या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. मागील उमेदवारांच्या कामगिरीपेक्षा डॉ.रोंगे यांचेकडून शिक्षकांना अभ्यासपूर्ण कार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डॉ. रोंगे सरांच्या या प्रक्रियेतील सहभागामुळे शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जवळपास ३० शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन सौ. प्रेमलता रोंगे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक अक्कलकोटचे प्राचार्य एन. बी. जेऊरे व सर्व प्राध्यापक वर्ग, मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट, सी. बी. खेडगीज् बसवेश्वर सायन्स कॉलेज, राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज अक्कलकोट, सी.बी.खेडगीज् इंटरनॅशनल स्कूल अक्कलकोट, मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मलराजे कन्या प्रशाला, अक्कलकोट, काशीराया काका पाटील प्रशाला, अक्कलकोट यांसह इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या तसेच अक्कलकोट तालुक्यातील अनेक संस्थापक, समाजसेवक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी डॉ. बी. पी. रोंगे सरांना पाठिंबा व शुभेच्छांचा वर्षाव करत डॉ. रोंगे सर शिक्षकांचे आमदार होतील अशी भावना व्यक्त केली. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार डॉ. बी.पी.रोंगे सर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांनी अक्कलकोट तालुक्यात झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांचे अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले असून सर्वांनी त्यांना विजयाची हमी दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव व निराणी शुगरचे रविकांत पाटील, रीनाती इंग्लिश मीडियम स्कूल चपळगावचे अध्यक्ष व मनीषा ऍग्रोसायन्सेस सोलापूर व्यवस्थापकीय संचालक उमेशजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अक्कलकोट तालुकाअध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे,मातोश्री धोंडूबाई कोंडीबा इंगळे प्रशाला, कर्जाळचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य सलगरचे चंद्रकांत इंगळे, श्री. स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था अक्कलकोटचे मार्गदर्शक सचिव मल्लिनाथ कल्याणशेट्टी या पदाधिकारी व जेष्ठ नेते यांना भेट देवून डॉ. रोंगे सरांची निवडणुकीत उतरण्याचे कारण स्पष्ट केले. या भेटी दरम्यान बोलताना सौ. प्रेमलता रोंगे म्हणाल्या की ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी व समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी डॉ. रोंगे सर कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी डॉ. रोंगे सरांना दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. रोंगे सर कोठेही कमी पडणार नाहीत.’ अशी ग्वाही सौ. प्रेमलता रोंगे यांनी दिली. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी काही प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते. यावेळी अक्कलकोट तालुका माध्य. व उच्चमाध्य. शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बंदीछोडे, उपाध्यक्ष शिवराज किलजे, कोषाध्यक्ष अशोक कलशेट्टी, सदस्य महादेव माने मुख्याद्यापक फरीद जमादार, विश्वनाथ बाणेगाव, संजय जानराव, रमेश शंकरय्या मठपती, हिरेमठ सर, महेश स्वामी, बसवराज धानशेट्टी, प्रशांत बिराजदार, राजरतन बाणेगाव, अमर पवार, विनय हिरेमठ व तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. या संवाद भेटीच्या कार्यक्रमाचे आभार देवा भाऊ भूषणे यांनी मानले.

0 Comments