LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोनालीका ट्रॅक्टर च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हेवी ड्युटी धमाका लकी ड्रॉ

 पंढरपूर प्रतिनिधी  : - 




आज सोनालीका कंपनीकडून संपूर्ण महाराष्ट्र मधून हेवी ड्युटी धमाका लकी ड्रॉ घेण्यात आला, ही आकर्षक स्कीम दसरा पर्यंत देण्यात आली होती. यामध्ये पहिले बक्षीस सोनालिका बक्षीस 52 एचपी चे तीन ट्रॅक्टर, दुसरे बक्षीस 11 रोटावेटर , तिसरे बक्षीस 25 मोटरसायकल, चौथे बक्षीस 40 एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस 45 फ्रिज, सहावे बक्षीस 50 वॉशिंग मशीन, सातवे बक्षीस 101 स्मार्टफोन, आठवे बक्षीस 150 मिक्सर आणि  नववे बक्षीस 400 डिनर सेट ही स्कीम सोनालिका कंपनीकडून 20 सप्टेंबर 2022 ते 6 ऑक्टोबर 2022 पर्यंत देण्यात आली होती.

       या लकी ड्रॉ ची सोडत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली  यामध्ये समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथून 50Rx हा ट्रॅक्टर श्री सुवर्णा विठ्ठल जाधव  रा- मरवडे, तालुका- मंगळवेढा यांनी खरेदी केला होता, या लकी ड्रॉ मधून सोनालीका कंपनीचा 52hp ट्रॅक्टरचे विजेते ठरले आहेत,  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत (आबा)पाटील साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

     या स्कीम मध्ये समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर कडून 62 ग्राहकांचा सहभाग होता यामध्ये 25 ग्राहक  वेगवेगळ्या वस्तूचे विजेते ठरले आहेत. या सर्व विजेत्यांचा सन्मान करून  त्याचे वितरण करण्यात आले.

      त्याचबरोबर सोनालिका हेवी ड्युटी दिवाळी धमाका ऑफर प्रत्येकी पाच ग्राहकांमध्ये लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे यामध्ये पहिले बक्षीस 5 ग्रॅम सोने, दुसरे बक्षीस 50 ग्रॅम चांदी आणि राहिलेल्या तीन ग्राहकांना प्रत्येकी 25 ग्रॅम  चांदी या लकी ड्रॉ मधून देण्यात येणार आहे. तरी या कालावधीमध्ये जे ग्राहक ट्रॅक्टर खरे त्यांना याचा जास्त फायदा होणार आहे या स्कीमचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आव्हान श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री.अभिजीत (आबा) पाटील साहेब यांच्याकडून करण्यात आले

      या हेवी ड्युटी लकी ड्रॉ चे आयोजन समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे एचडी स्क्रीन लावून आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी सर्व ग्राहक बांधव शेतकरी बांधव त्याचबरोबर धाराशिव साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री अभिजीत कदम साहेब, सोनालिका कंपनीकडून मा.श्री. सुरेंद्र सिंग ठाकूर सर, मॅनेजर सोमनाथ केसकर आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments