मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मंगळवेढा येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक शनिवारी दुपारी 4.30 वा. जावळे मुढे गल्लीतील लोकमंगल सभागृहात जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सुरुवातीस छत्रपती शिवराय व थोर मराठा कै आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व सारथी योजनेबाबत जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मंगळवेढा शहर व तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाची पुर्नबांधणी कार्यकारणी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील युवक युवतींनी तसेच सर्व मराठा समाज बांधवांनी मंगळवार दि.15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वा. किल्ला भागातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन चव्हाण यांनी केले.
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजातील एक लाख युवक उदयोजक बनले पाहिजेत हे ध्येय आहे.त्यासाठी अर्जूनराव चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून जिल्हयामध्ये 4846 बेरोजगार तरूणांना उदयोजक बनविले आहे.मराठा समाजातील युवकांना एक लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत बिगरव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. आजपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा रक्कम - 23 कोटी ,98 लाख, 82 हजार,872 रुपये,कर्ज मंजुरी संख्या 4946 तर कर्ज रक्कम वाटप 297 कोटी , 94 लाख,74 हजार,095 रुपये इतकी प्रकरणे झाली आहेत.
यापुढेही मराठा समाजातील युवक उदयोजक बनले पाहिजेत म्हणून जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण हे सतत प्रयत्नशील आहेत.
या कार्यक्रमास सचिन डोरले,हरीप्रसाद देवकर,गणेश ओमने,आण्णासाहेब आसबे,प्रदिप पडवळे,सौरभ गुंगे,रोहित भुसे,गणेश सावंजी,राहुल नागणे,विवेक लेंडवे,निवृत्ती कदम,अजित लेंडवे,आण्णा ओमने,सागर ढगे,अमोल नागणे,अजय नाईकवाडी,सागर वाघमारे,संग्राम माने यांचेसह अनेक युवक व मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन,प्रास्ताविक,आभार भारत मुढे यांनी केले.या कार्यक्रमास



0 Comments