यवतमाळ प्रतिनिधी: -
यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन महिलांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी भाजप पदाधिकारी आणि विविध शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी, त्याच्या नोंदी, लिंगनिदान कायद्याची अंमलबजावणी, महिला धोरण याविषयी सकारात्मक चर्चा केली. तर पोलिस अधिक्षक श्री. पवन बनसोड यांच्याशी जिल्ह्यातील महिला अत्याचाराचे प्रमाण, गुन्ह्यांची उकल, तक्रारींचे प्रमाण, आरोपींच्या अटकेचे प्रमाण, विशाखा आणि दक्षता समिती याबाबत संवाद साधला.



0 Comments