पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील मंदिर परिसरात राहणाऱ्या लोकांनी मास्टर प्लॅन बाबत घाबरून जाऊ नये,नागरिकांच्या हितासाठी उच्च न्यायालयात आम्ही aamchya स्वतःच्या खर्चाने केसेस लढवू , वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन केले जाईल अशी माहिती मनसे चे ज्येष्ठ नेते दिलीप(बापू)धोत्रे यांनी पंढरपूर येथील मनसे कार्यालय येथे मंगळवार दि १५नोव्हेंबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले,आमच्याबद्दल अपप्रचार,करण्याचे काम सत्ताधारी लोकांनी सुरू केले आहे,पण सत्य काय आहे ते आता जनते समोर आले आहे,दोन महिन्यापूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असे होणार हे सांगितले होते,हा विषय अतिशय गंभीर असून यात राजकारण केले जाणार नाही.अनेक जण आता विकास प्रारूप आराखडा मधून आपली जागा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे श्री धोत्रे यांनी सांगितले, भोळ्या भाबड्या जनतेचा सत्ताधारी लोकांनी विश्वासघात केला असा आरोपही दिलीप बापू धोत्रे यांनी यावेळी केला.


0 Comments