LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जय महाराष्ट्र युवा मंच आयोजित किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 पंढरपूर (प्रतिनिधी) 




पंढरपूर येथील जय महाराष्ट्र युवा मंच  आणि रुक्मिणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे सोलापूर जिल्हा प्रशासन अविनाश पोफळे उपस्थित होते. जय महाराष्ट्र युवा मंच तर्फे आयोजित किल्ला स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अर्जुन चव्हाण यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले तसेच दुर्गप्रेमींना या कार्यक्रमात प्रेरणा देवून दुर्ग संवर्धनाचे महत्व आपल्या ओघवत्या शैलीत विषद केले. तर प्रमुख पाहुणे श्री अविनाश पोफळे यांनी विविध दुर्ग प्रकारांची माहिती , पर्यावरणीय दृष्टीने गडकोटाचे संरक्षण तसेच दुर्ग संवर्धनाच्या कार्याची गरज या विषयावर संवाद साधून गडप्रेमींना बहुमोल मार्गदर्शन केले.

 

सदर किल्ला स्पर्धा ही शालेय गट , महिलांसाठी हिरकणी गट, खुला गट आणि सांघिक गट अश्या चार गटात आयोजित केली होती. किल्ले बांधणी पर्यावरणपूरक सजावट आणि गडकिल्ले विषयाचे ज्ञान यांच्या आधारे या किल्ल्याचे परीक्षण करण्यात आले. परीक्षक म्हणून सोहम व्होरा, श्रीराम साळुंखे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रुक्मिणी प्रतिष्ठानचे सुनंजय (दादा) पवार  तसेच जय महाराष्ट्र युवा मंचाचे श्रीराम साळुंखे, श्रीकृष्ण साळुंखे , मनीष कुलकर्णी, मुकुंद बडवे , आदित्य बिडकर, सम्मेद मुत्तीन यांनी परिश्रम घेतले. 


किल्ला स्पर्धा २०२२ चे पारितोषिक वितरण पुढील प्रमाणे :-


मोठा गट :- 

प्रथम क्रमांक:- वरद बडवे

द्वितीय क्रमांक:- अभिषेक कुलकर्णी

तृतीय क्रमांक :- ज्ञानेश बोंबलेकर


हिरकणी गट:-

प्रथम क्रमांक :- पूजा जमदाडे

द्वितीय क्रमांक:- क्षितिजा पेटकर

तृतीय क्रमांक:- श्वेता घाडगे  


शालेय गट:-

प्रथम क्रमांक:- शिवप्रेमी १० ग्रुप

द्वितीय क्रमांक:- बडवे गल्ली ग्रुप

तृतीय क्रमांक:- सृष्टी बडवे


सांघिक गट:-

प्रथम क्रमांक:- ATM ग्रुप

द्वितीय क्रमांक:- सारंग कुंभार मित्र परिवार

तृतीय क्रमांक:- अदिती पिंपळे व सहकारी


विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक :- महेश तमखाने

Post a Comment

0 Comments