.पंढरपूर(प्रतिनिधी)
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरी कलारत्न व विशेष गुणवत्ता पुरस्काराचे वितरण कर्मयोगी सभागृह, पंढरपूर अर्बन बँक खवा बाजार शाखा येथे, सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मागील १४ वर्षा पासून ही संस्था कार्यरत आहे.
याचवेळी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषीक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी पंढरीचे सुपुत्र ज्येष्ठ सिने दिग्दर्शक डॉ. जब्बारजी पटेल यांच्या नाट्य व सिने क्षेत्राताली योगदाना बद्दल जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, संस्थेच सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्याच बरोबर राष्ट्रीय पातळीवर ज्या दहा शास्त्रज्ञांची इस्त्रो या अंतराळ संस्थेत निवड झाली त्या सोमनाथ माळी, एम.सी.एच. रिप्रॉडक्टीव्ह मेडिसीन मध्ये सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल डॉ. तेजस विवेक गुंडेवार यांना, अॅटोडाऊन मेकॅनिझम फॉर मोटार व्हेइकल यामध्ये जागतीक पेटंट मिळवल्याबद्दल श्री प्रसादजी रानडे यांना तर प्रा. सि. जी. जगताप सर यांना संस्कृत भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा या हेतूने गेली दोन दशके गीतामाता संस्कृत प्रबोधनीच्या माध्यमातून कार्य केल्याबद्दल, तसेच डॉ. सौ. मैत्रेयी मंदार केसकर यांनी वक्तृत्व कलेचा वाड़मयीन अभ्यास यामध्ये पी. एच. डी. प्राप्त केल्याबद्दल, तर डॉ. प्रशांत ठाकरे यांना संत धुंडामहाराज देगलुरकर यांच्या कीर्तन आणि प्रवचनांचा सांस्कृतिक व वाड्मयीन अभ्यास या विषयात पि.एच.डी. प्राप्त केल्याबद्दल तर डॉ. सौ. विनया राजेंद्र मोरे मॅडम यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात पि.एच.डी प्राप्त केल्याबद्दल तर कु. जान्हवी भालचंद्र पुजारी या विद्यार्थिनीने भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य परिक्षेत अलंकार पूर्ण ही परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच कोविड १९ ची पहिली लस घेऊन स्वतःच्या जिवावर उदार होऊन अनेकांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने सर्व प्रथम कोविड१९ ची पहिली लस घेणाऱ्या व युटोपियन शुगरच्या एम.डी. पदी निवड झाल्याबद्दल रोहन परिचारक यांना विशेष गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रेया बडवे या विद्यार्थिनीच्या गणेश वंदनाने झाली. आपल्या भाषणातपंढरी कलारत्न पुरस्काराबद्दल डॉ. जब्बार पटेल म्हणाले की अत्यंत बिकट परिस्थितीत पंढरपूर, सोलापूर व दौंड या गावातून शिक्षण घेत पुणे येथे डॉक्टर झालो. व घाशीराम कोतवाल या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शनाने नेम व फेम मिळाले. तसेच सामना, चौकट राजा, जैत रे जैत, सिंहासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उंबरठा आदी सिनेमांचे दिग्दर्शन करायची संधी मिळाली. हे माझे भाग्य समजतो. अनेक हायफाय स्टारकास्ट बरोबर काम करताना खूपच आनंद मिळला तर चित्रपटांची गाणी लिहून घेताना ग. दी. माडगुळकरांसारखा प्रतिभावंत कवि जवळून पाहायला मिळाला. आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार या चित्रपटांना मिळाले आहेत पण त्या पुरस्कारापेक्षाही आजचा माझ्या गावाता माझ्या मातीतील पुरस्कार हा कोणत्याही जाती धर्म नसलेल्या, एकच विठ्ठल भक्तीचा ध्यास असलेल्या माझ्या सारख्या या जन्मभूमित जन्मलेल्या वारकऱ्याला दिलेला सन्मान आहे. आपल्या भाषणात आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की आजही राजकारण कसे असते व काही बिकट राजकीय परिस्थितीत कसे निर्णय घ्यावे लागतात हे सांगणारा सिंहासन व सामना हे चित्रपट म्हणजे राजकारणी लोकांना एक वस्तुपाठ आहे. कलासाधनाच्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत कायम मोठे मालक (कै. सुधाकरपंत परिचारक) हे कार्यक्रमाच्या अग्रस्थानी असायचे आता त्याच नात्याने ही जबाबदारी माझ्यावर आल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी सांगितल्यान यापुढे ही कायम मंडळाच्या पाठीशी मोठ्या मालकांच्याच रुपान उभे राहीन.
यावेळी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांच्या कार्याचा परिचय करून दिला. व संस्थेचे कार्य असेच उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येकान शक्य ती मदत संस्थेला करावी असे आवाहन केले. यावेळी प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार सिंहगड इंजि. कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करंडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक सदस्य राजेंद्र माळी साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे खजिनदार ज्ञानेश मोरे सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ज्ञानेश्वर मोरे सर म्हणाले की संस्थेने तपपूर्ती केली आहे त्यानिमित्त पंढरपूरच्या कलेचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा व संस्थेच्या १४ वर्षाचा परिचय व्हावा म्हणून लवकरच तपपूर्ती स्मरणिका प्रसिध्द करणार आहोत त्यासाठी जाहीरातीच्या माध्यमातून संस्थेस सहकार्य करावे. तसेच संस्थेच्या कार्याचा परिचय अमरसिंह चव्हाण सर यांनी करून दिला. सर्व विशेषगुणवत्ता पुरस्कार विजेत्यांच्या वतीने डॉ. सौ. मैत्रेयी केसकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.. मैत्रेयी मॅडम म्हणाल्या की, गेली चौदावर्षे सतत या कार्यात गाडून घेणारे श्रीकांत महाजन बडवे व विनायक परिचारक या संस्थेला लाभले व त्यांनी सतत एकतप मातीत गाडून घेतल्याने वृक्ष बहाराला आलेला दिसत आहे.
यावेळी डॉ. जब्बार पटेल यांची रसभरीत साभिनय मुलाखत श्रीकांत बडवे महाजन, सौ. प्रियदर्शनी सरदेसाई व एन. एन. कुलकर्णी सर यांनी घेतल्याने समारंभात अधिकच रंगत आली. मुलाखतीच्या दरम्यान डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट चित्रिकरणाच्या वेळी आलेले अनुभव, कॅमेऱ्याचे अँगल, प्रसंगानुरूप करावे लागणारे बदल याचे अनेक बारकावे साभिनय विषद केले. तसेच सामना सिनेमाच्या चित्रिकरणाच्यावेळी आलेले अनेक अनुभव व अडचणी सांगितल्या. यामध्ये निळू फुले व डॉ. श्रीराम लागू या दोन दिग्गज
अभिनेत्यांच्या आवाजाची खूपच अडचण निर्माण झाली होती. कारण ज्या मोठ्या दोन दिग्गजांमध्ये सामना रंगणार होता त्या दोघांचाही आवाज खर्जातला होता. पण जेव्हा ही अडचण लागुंच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी जब्बारजीना सांगितली तेव्हा डॉ. लागूनी आपल्या आवाजाची पट्टी बदलली व ती कशी बदलली ते साभिनय करुन दाखवली. त्यावेळी उपस्थितांच्या टाळ्याला पारावर राहीला नव्हता.
आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. बाळकृष्ण बडवे यांनी हे कार्य असेच अविरत सुरु म्हणून संस्थेच्या सदस्यांना मार्गदर्शक मौलिक सूचना केल्या. यावेळी संस्थेच्या वतीने दि. ठेवावे १६,१७,१८ नोव्हेंबर रोजी विवेकानंद जयंती निमित्त विविध स्पर्धा घेतल्या होत्या त्याचा पारितोषीक वितरण समारंभही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी डॉ. बाळकृष्ण बडवे यांच्या हस्ते यावेळी विविध स्पर्धांचे परिक्षण केल्याबद्दल प्रा. सि.जी. जगताप सर, वा. गो. भाळवणकर सर, सौ. ज्योती शाम चव्हाण मॅडम, सौ. सारिका अरिहंत कोठाडीया मॅडम, सौ. स्नेहल पाठक मॅडम, सौ. प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम, सोमनाथ सुर्यवंशी, गजानन सावंत सर, सौ. सोनाली वांगीकर मॅडम, सौ. मंदाकिनी देशपांडे मॅडम, सौ. रेश्माताई गुजर मॅडम, श्री. प्रद्युम्न कमठाणकर सर, माउली दुधाने सर यांचा परिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. तर कोणताही मोबदला न घेता गेली १४ वर्षे पांडुरंग भवन मोफत उपलब्ध करुन दिल्या बद्दल अनिरुध्द बडवे पाटील यांचाही गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन, प्रा. विनायक परिचारक सर, सागर विश्वासे सर, अमरसिंह चव्हाणसर, रणजीत पवार सर, अक्षय बडवे, राजेंद्र माळी साहेब, संजयभाई शहा, अनिरुध्द बडवे पाटील, सौ. आदिश्री बडवे, श्रीकांत लव्हेकर, राजेश अंबिके, राजेंद्र जाडकर, नारायण बडवे, बाळासाहेब नवले, आनंद सरवदे, ज्ञानेश मोरे आर्दीनी विशेष परिश्रम घेतले. र्काक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनया उत्पात कुलकर्णी यांनी केले तर आभार सागर विश्वासे सर यांनी मानले. सदर कार्यक्रमास परिसरातील मान्यवरांसह स्पर्धक व पालक व नागरीक उपस्थित होते.
0 Comments