LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

रविवारी धनगर समाजाच्या वतीने महेश साठे यांचा कृतज्ञता सत्कार

 


*पंढरपूर येथील अहिल्यादेवी होळकर पुतळा सुशोभीकरण कामी  विशेष प्रयत्न केला आहे*

पंढरपूर, प्रतिनीधी



पंढरपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुशोभीकरण करण्याचे काम पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात राहून गेले होते. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचा अंतर्भाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करावा यासाठी , शिवसेना संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या कामाचा अंतर्भाव करून घेतला आहे. यासाठी धनगर समाजाच्या वतीने महेशनाना साठे यांचा सत्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर  करण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.


या सत्कार सोहळ्याचे वेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील  यांच्यासह धनगर समाजातील सर्व प्रमुख नेते , विविध राजकीय पक्षातील  धनगर समाजातील पदाधिकारी, विविध पदावर धनगर समाजातील अनेकांना पदे मिळाली आहेत.असे सर्व समाज नेते उपस्थित राहणार आहेत. 

हा कार्यक्रम रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. याकरिता धनगर समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे कळविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments