LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‘पालक सभा’ संपन्न

  पंढरपूर प्रतिनिधी : - 



न्यु सातारा समुह मुंबई संचलित, न्यु सातारा पॉलिटेक्निक कॉलेज, कोर्टी येथे दि. १८ व १९ नोव्हेंबर २०२२ रोजी संस्थेचे संचालक मा.डॉ. श्री. लक्ष्मीकांत राजाराम निकम व प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात चर्चा होण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व विभागामार्फत  शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पालक सभा संस्थेचे संचालक मा.डॉ. श्री. लक्ष्मीकांत राजाराम निकम, संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे ,प्राचार्य विक्रम लोंढे, प्राचार्य डॉ. एन.एन.तंटक, शैक्षणिक समन्वयक श्री. विशाल बाड, रजिस्ट्रार श्री. सतीश दिंडूरे यांच्या उपस्थितीतीत घेण्यात आली. 

सदर पालक सभा प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विभागानुसार  दोन दिवस महाविद्यालयाच्या सेमिनार रूम मध्ये घेण्यात आली. दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी द्वितीय व तृतीय वर्षाच्या सर्व विभागाची शिक्षक-पालक सभा घेण्यात आली. आणि दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रथम वर्षातील सर्व विभागाची शिक्षक-पालक सभा घेण्यात आली. सुरुवातीस संस्थेचे संचालक मा.डॉ. श्री. लक्ष्मीकांत राजाराम निकम व प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या हस्ते उपस्थित सर्व पालक वर्गाचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर विभाग प्रमुख प्रा. विक्रम माळी, प्रा. कु. बनगोसावी, प्रा. नितीन कलागते, प्रा. सचिन पुरी व प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब ननवरे यांनी आपल्या विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी  घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमासंबंधी उपस्थित पालकांना माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल उपस्थित पालकांसमोर संगणकीय सादरीकरणाद्वारे मांडला. तसेच  प्राचार्य विक्रम लोंढे यांनी महाविद्यालयाच्या कार्य पद्धतीचा अहवाल व महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल  सर्व पालकांसमोर मांडला. 

 कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संचालक मा.डॉ.श्री. लक्ष्मिकांत राजाराम निकम यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास कसा साधावा व विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न करण्यामध्ये पालकांनी हातभार लावावा असे आव्हान उपस्थित पालकांना केले. तसेच पालक प्रतिनिधी श्री. उदय ऐवळे, श्री. काशिलिंग सरक, श्री. सत्यवान मुडे, सौ. वंदना कांबळे व श्री. राजकुमार विठ्ठल भोसले  यांनी आपल्या मनोगतामध्ये  विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान करत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित सर्व पालकांच्या विध्यार्थ्याविषयी असणाऱ्या समस्यांचे निरसन प्रत्येक विभागातील सर्व विभागप्रमुख व सर्व शिक्षक यांनी  केले. शैक्षणिक समन्वयक प्रा. विशाल बाड यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तपालन व कठोर परिश्रम कण्यावर विद्यार्थ्यांना जोर देण्यास सांगून त्याचा उपयोग विविध  कंपन्यांमध्ये नोकरी करत असताना उपयुक्त राहील असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पुरी व प्रा.कु. सपना धोड्मिसे यांनी पार पाडले. सभेच्या शेवटी व्यवस्थापक श्री. राजेंद्र घाडगे यांनी उपस्थित सर्व पालकांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments