LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरातील सो. क्ष. कासार समाजाच्या नूतन कार्यकारी मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न

पंढरपूर- 


येथील श्री कालिका देवी मंदिरात नुकताच सो. क्ष. कासार समाज, पंढरपूरच्या नूतन अध्यक्ष, कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथविधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

      या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील बांधकाम व्यवसायिक व प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्रजी अचलारे, अध्यक्ष श्री कालिका देवी संस्था, पुणे श्री.आनंदजी डांगरे, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांतजी सासवडे, भा.ज.पा.  सोलापूर शहरचे मा. उपाध्यक्ष श्री मोहनजी डांगरे हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री कालिकामातेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मावळते अध्यक्ष श्री बाळासाहेब होरणे व त्यांच्या कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे आजी अध्यक्ष श्री बाळासाहेब भिवरे व आजी सेक्रेटरी श्री माधव डोंगरे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे मावळते अध्यक्ष श्री बाळासाहेब होरणे यांनी नूतन अध्यक्ष श्री. विजय मोहोळकर, उपाध्यक्ष- सुधीर सासवडे, चेअरमन अभय भिवरे, सेक्रेटरी शशिकांत वाडेकर, सह-सेक्रेटरी राजेंद्र झरकर, खजिनदार अमित मांगले, कार्यकारी विश्वस्त अविनाश जगधने, प्रदीप येवनकर, मनोज होरणे, मिलिंद विभुते, प्रसाद येवनकर, प्रा.अमित डोंगरे, भूषण मोहोळकर, सोमनाथ होरणे, मनोज भाळवणकर यांच्यासह सर्व नूतन कार्यकारी विश्वस्तांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तसेच अॅडव्होकेट श्री उज्वल मोहोळकर यांची युवक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.राजेंद्रजी अचलारे, पुणे जिल्हा कासार विकास समितीचे अध्यक्ष आनंदजी डांगरे, श्री कालिकादेवी संस्थेचे चेअरमन श्री प्रतापशेठ अचलारे, भा.ज.पा.  सोलापूर शहरचे मा. उपाध्यक्ष श्री मोहनजी डांगरे यांनी समयोजित मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब होरणे यांनी नवीन कार्यकारी मंडळास शुभेच्छा व्यक्त करून नवीन कार्यकारी मंडळास कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. नुतन अध्यक्ष श्री. विजय मोहोळकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक वाटचालीची माहिती देत, पुढील कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन स्वेरी कॉलेजचे प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार जेष्ठ पत्रकार व पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री सत्यविजय मोहोळकर यांनी मानले. या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

Post a Comment

0 Comments