*सावरकर प्रेमी मंडळ पंढरपूर*.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र पंढरपूरच्या अभ्यास केंद्रात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या कु. कविता टाकळे यांची २०२१ सालीच्या STI परीक्षेत उज्वल यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
सत्कार समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे जेष्ठ संचालक श्री भाऊ ताठे होते. संस्थेच्या संचालिका सौ. राधिका उत्पात यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
सत्कार नंतर कु. कविता टाकळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी यशस्वीतेचा कानमंत्र अभ्यासिकेतील विद्यार्थी मित्रांना दिला. स्पर्धा परीक्षेतील अपयशाने निराश न होता पुन्हा तितक्याच उत्साहाने, चिकाटीने निराशतेवर मात केल्यास यश नक्की मिळेल असे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या संचालिका सौ. राधिका उत्पात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत अभ्यास करीत असतात. त्यासाठी प्रत्येकाने यशाची रणनीती ठरवली पाहिजे म्हणजे हमखास यश मिळते. प्रशासकीय सेवेतून आपण चांगल्या प्रकारे देशसेवा करून भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारी नवीन पिढी यातून निर्माण होत आहे. याचा मनस्वी आनंद असून सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी संस्थेकडून मनपूर्वक शुभेच्छा देऊन यशस्वी विद्यार्थिनीलाही पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
संपर्क:
स्वा सावरकर मुक्तद्वार वाचनालय व सावरकर प्रेमी मंडळ पंढरपूर.
भ्रमणध्वनी.९९२१९०१७१८
0 Comments