पंढरपूर प्रतिनिधी : -
पंढरपूर शहरातील अन्यायकारक कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे पंढरपूर शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी कार्यकर्ते महाराज मंडळी मंदिर परिसरातील नागरिक आणि संत भूमी बचाव समिती व संघर्ष समिती यांचे पदाधिकारी या सर्वांनी भेट घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी माननीय राज साहेब ठाकरे यांनी सांगितले की मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून निश्चितपणे या मधून मार्ग काढतो कोणावरही अन्याय होऊ देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे सर्व पंढरपूरकरांच्या पाठीशी कायम राहील...
0 Comments