पंढरपूर: (प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी परीक्षेमध्ये यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परिक्षेमध्ये इ. ५ वी मधील २४विद्यार्थी तर इ. ८ वी मधील १७विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप म्हणून विद्यालयांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जनरल बॉडी सदस्य डॉ.राजेंद्र जाधव, व स्थानिक स्कुल समिती सदस्य, आनंदराव थिटे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ए. के. साळवे ,वरिष्ठ लेखनिक पी. व्ही. गोंजारी वरिष्ठ शिक्षक . जी. आर.नलवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच सर्व पालक वर्गातून शिष्यवृत्ती विभागप्रमुख .आर.बी ऐवळे व जी. एस. कानडे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सत्कार प्रसंगी विद्यालयातील सर्व सेवक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.




0 Comments