LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कार्तिकी यात्रेकाळात विठ्ठल रुक्मिणी चरणी भक्तांनी दिले भरभरून दान.

 

विठ्ठलाच्या चरणी ३ कोटी २० लाखाचे दान  

पंढरपूर -(प्रतिनिधी)



कार्तिकी यात्रे दरम्यान पंढरपूरातील  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ कोटी वीस लाख ५९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये भक्तनिवास, लाडू प्रसाद, देणगी पावती, दागिने , देवाच्या चरणी रोख, सोने, चांदी,ऑनलाईन देणगी, अन्नदान निधी,  मोबाईल लाॅकर, परिवार देवता पुजा दान भाविकांनी अर्पण केले आहे. 

सर्व सामान्यांचा, वारकरी, भाविक भक्ताचां देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायांची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रे दरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेबरोबरच सोन्या चांदीच्या दागिन्यांची ही मोठी भर पडली आहे.मागील दोन वर्षात कोरोना साथरोगाच्या लॉक डाऊन मुळे मंदिर समितीला मंदिर बंद ठेवावे लागले.याकाळात उत्पंन बंद असेल तरीही खर्च सुरूच होता,यामुळे कोरोना साठीचा फटका बसून कोट्यवधी रुपयांचा  तोटा सहन करावा लागला होता.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीला एक कोटी वीस लाख रूपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समिती प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments