पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील युवक काल सोलापूर वरून येत असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. व त्या अपघातामध्ये पंढरपूर शहरातील तानाजी चौक येथील ३ युवकांचा अपघातस्थळी दुर्दैवी अंत झाला. हृदय हेलकावून टाकणाऱ्या घटनेची बातमी कळताच पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष तथा लोकप्रिय *आमदार समाधानदादा आवताडे* यांनी सदर कुटुंबातील सदस्यांची सांत्वन पर भेट घेतली.
प्रत्येकाच्या संवेदनशील नैतिकतेला वेदना देणाऱ्या या घटनेने संपूर्ण पंढरपूर शहर व तालुका शोकसागरात बुडाला आहे. क्रूर नियतीच्या काळाने तीन कर्तबगार तरुणांना झडप घालून आपल्यापासून हिरावून घेतले आहे ही खूप मोठी दुःखाची परिसिमा आहे. या तिन्ही परिवारातील सदस्यांना यातून लवकरात - लवकर सावरण्याचे परमात्मा श्री पांडुरंग - रखुमाई बळ देवो अशी प्रार्थना आमदार मा. दादासाहेब यांनी केली.
यावेळी श्री.शेखर बंटी भोसले,श्री. विनोदराज लटके,श्री.दत्ता काळे महाराज, लखनराज थिटे बादल सिंह ठाकुर, भास्कर तात्या जगताप, शशीकांत म्हेत्रे सर,मदन शिंदे, पांडूरंग करकमकर, संग्राम माने, संघर्ष भोसले, ध्रुव साबळे,गणेश निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.




0 Comments