LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

एलिझाबेथ एकादशी, या मराठी चित्रपटास झाली ८वर्षे पूर्ण .

 पंढरपूर मध्ये तयार झालेला चित्रपट 



पंढरपूर (प्रतिनिधी) सुमारे आठ वर्षांपूर्वी याच दिवशी दि१४नोव्हेंबर (बालदिन) मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजलेला ,पंढरपूर तीर्थक्षेत्र च्या पावन नगरीत चित्रीकरण झालेला एलिझाबेथ एकादशी, हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पंढरपूर मधील बालकलाकार व येथील मोठे कलाकार यांचा सुंदर अभिनय या सिनेमात होता. या सिनेमाने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले सर्वोच्च मानाचा राष्ट्रपती सुवर्णपदक, झी गौरव सर्वोत्कृष्ट चित्रपट असे पुरस्कार मिळाले,श्यामची आई, या सिनेमानंतर प्रथमच मराठी सिनेमास राष्ट्रपती सुवर्णकमळ सन्मान प्राप्त झाला, यामुळे अवघी मराठी सिनेइंडस्ट्री  हरखून गेली. मराठीतील नामवंत ,कल्पक दिग्दर्शक व लेखक श्री परेश मोकाशी व त्यांच्या पत्नी मधुगंधा कुलकर्णी  यांनी अतिशय मेहनत घेऊन हा सिनेमा वर्षभरात पूर्ण केला.या सिनेमाचे पूर्ण चित्रीकरण पंढरपूर शहर व परिसरात झाले .लहान मुलांचे अनोखे भावविश्व ,या मुलांना एखादया प्रिय वस्तूचा लागलेला जिव्हाळा ,व ती वाचवण्यासाठी चाललेली या चिमुकल्याची धडपड असा काहिसा बाज होता. आपल्या शास्त्रज्ञ असणाऱ्या दिवंगत वडिलांनी स्वतः तयार केलेली सायकल, की जी त्यांच्या गरिबी परिस्थितीमुळे विकावी लागणार असते या सायकलचे नाव असते एलिझाबेथ . वडिलांची आठवण म्हणून प्राणप्रिय असणारी सायकल कशी वाचवतात ही लहान मुले हे अतिशय रंजकतेने सादर करण्यात आले होते. या चित्रपटात सर्व बालकलाकार हे येथील कवठेकर प्रशालेतील होते .या बालकलाकाराचा सहजसुंदर व नैसर्गिक अभिनय ही सर्वात जमेची बाजू ठरली. पुणेकर चोखंदळ रसिकप्रेक्षकांनीही या चित्रपटाचे मोठे कौतुक केले.  सिनेमातील द्याना, गण्या व झेंडू यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पंढरपूर शहरातील मंदिर परिसर ,ताकपिठे विठोबा बोळ, मंडई, बाजार समिती ,सारडा भवन परिसर ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,एस टी स्टँड, वाळवंट येथे चित्रीकरण करण्यात आले. पंढरपूरचे चतुरस्त्र कलावंत श्रीकांत महाजन बडवे यांनी संपूर्ण सहकार्य केले.चित्रपटाच्या टीमची सर्व व्यवस्था, निवास,भोजन ,आवश्यक परवानगी व इतर  बाबीची पूर्तता त्यांनी केली सिनेमातही महत्वाची भूमिका केली. सिनेमाचा प्रीमिअर येथील सरगम चित्रपटगृहात आ.प्रशांत परिचारक,परेश मोकाशी,मधुगंधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पंढरपूरचा सिनेमा असल्याने बालगोपाळासह अनेक प्रेक्षकांनी गर्दी केली.  , दिग्दर्शक, लेखक परेश मोकाशी सिनेमाच्या लेखिका व पंढरपूरच्या मधुगंधा कुलकर्णी यांचे बालपण पंढरपूर येथे गेले,आपल्या भावसह अनुभवलेल्या  सत्यकथेवर सिनेमा त्यांनी लिहिला. व पुढे या सिनेमाने इतिहास घडविला. पंढरपूरकरसाठी निश्चितच ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. कथा पंढरपुरात घडत असल्याने येथील स्थानिक कलाकारांनाच संधी देण्यात आली,एकमेव पुण्याचा श्रीरंग महाजन वगळता सर्व बालकलाकार व मोठे कलाकार हे पंढरपूर शहरातील होते, यानिमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकण्याची  संधी स्थानिक कलाकारांना मिळाली. प्रीमियर शो च्या दिवशी सर्व बालकलाकाराची बग्गीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हा सिनेमा बनविण्यासाठी लेखिका मधुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी यांनी सर्वस्व पणाला लावले होते. झी टॉकीज च्या निखिल साने,नितीन केणी यांनी सिनेमाची वितरण जबाबदारी घेतली कारण मोकाशी यांच्या कल्पकतेची जाण त्यांना होती.हा सिनेमा दीड कोटी बजेटमध्ये मध्ये तयार झाला व सिनेमाने सात कोटी एवढा व्यवसाय केला.या सिनेमातील पुष्कर लोणारकरची गण्या ही भूमिका एवढी गाजली की पुढे पुष्करला पंधरा सिनेमात काम मिळाले. बाजी, चि व चि सौ कां, स्वीटी सातारकर, सलमान सोसायटी या सिनेमात त्याला संधी मिळाली. लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी कवठेकर प्रशालेत जाऊन बालकलाकारांची निवड केली व त्यांना काही दिवस अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या सिनेमात सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश महाजन बडवे, चैतन्य बडवे,चैतन्य कुलकर्णी, विशाखा सावंत या पंढरपूरच्या तर श्रीरंग महाजन या पुण्यातील बालकलाकारांनी अभिनय केला, तसेच श्रीकांत महाजन बडवे,शाम सावजी, पद्मा सावजी,चैतन्य उत्पात, राजेश अंबिके, प्रमोद शेटे, योगीराज परांडकर,चेतन देवडीकर, सुनील यारगट्टीकर,नंदकुमार कुलकर्णी, शांताराम कुलकर्णी, डॉ वर्षा काणे, विजय सगर या पंढरपूरच्या आणि वनमाला किणीकर या सोलापूरच्या कलाकारांनी अभिनय केला.या सिनेमाचा प्रिव्ह्यू मोकाशी यांनी मुंबईत अभिनेता सनी देओल यांच्या जुहू येथील सनी साऊंड प्रा ली च्या आलिशान प्रायव्हेट टॉकीज मध्ये दि ३मे २०१४ यादिवशी आयोजित केला होता, आणि या खास शोसाठी पंढरपूरच्या सर्व कलाकारांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments