करकंब.. प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील करकंब व गार्डी येथिल महाराष्ट्रात विक्री परवाना नसताना इंदोरच्या 'मॉडर्न अग्रिजेनेटिक्स लिमिटेड, कंपनी चे औषध फवारणी केलेल्या मुळे २० ते २५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे गायस्टॉप हे बोगस तननाशक औषध फवारल्या मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेल आहे शेतकऱ्याच्या द्राक्ष बागा फुटलेल्या नाहीत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचा नुकसान झालेल आहे या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे अगोदरच कर्जबाजारी झाला आहे
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा एकीकडे कंबरडे मोडले असताना पंढरपूर तालुक्यातील काही दुकानदार , व डीलर महाराष्ट्र मध्ये बंदी असलेली काही औषधे शेतकऱ्यांच्या माथीमारत आहेत त्यामुळे चुकीचा औषध द्राक्षा सारख्या सोबत संवेदनशील पिकाला हानिकारक ठरत आहे या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून आत्महत्या शिवाय पर्यायच राहिला नाही असे बोलत आहेत आज या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत सर व भाजप किसान मोर्चा चे माऊली हळणवर यांनी भेट दिली शेतकऱ्यांच सांत्वन केलं व मदत मिळवून देण्यचे आश्वासन दिले यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की शेतकऱ्यांनी हादरून न जाता आलेल्या संकटाला सामोरे जावं आम्ही तुमच्या सोबत आहोत राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे कंपनीकडून दुकानदाराकडून व सरकारकडूनही मदत मिळुवु व सदर कंपनी डीलर दुकानदार यांच्या वरती गुन्हा दाखल करूया असे आश्वासन दिले
यांच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजीराजे बाबर व याभागातिल नुकसान ग्रस्त शेतकरी अमर व्यवहारे यांचे सह शेतकरी उपस्थित होते
0 Comments