पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका ,' लोकसत्ता ' चे वार्ताहर मंदार लोहोकरे यांच्या मातोश्री उषा गंगाधर लोहोकरे यांचे वार्धक्याने
व आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या
पार्थिवावर शनिवारी सकाळी पंढरपुरात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषा लोहोकरे सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. पंढरपूरच्या आदर्श प्राथमिक विद्यालयात त्यांनी प्रदीर्घ अध्यापन सेवा केली होती. शिस्तीच्या आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments