LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

100 लिटर हातभट्टी दारु जप्त*

 राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

   


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने 22 डिसेंबर रोजी मोहोळ तालुक्यात कोळेगाव गावाच्या हद्दीत एका मारुती स्विफ्ट कारमधून 100 लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे प्रभारी दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांना हातभट्टी  दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 22 डिसेंबर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मोहोळ-सोलापूर रोडवर कोळेगाव (ता. मोहोळ) गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH45 N 6878 येतांना दिसली, त्यांनी वाहनास थांबवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात सात प्लास्टीक कॅनमध्ये 100 लिटर हातभट्टी दारु मिळून आली. वाहनचालक हणमंत वसंत चव्हाण, रा. बुधवार पेठ ता. मोहोळ या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 6 हजार दोनशे पन्नास किंमतीची हातभट्टी दारु व कारसह एकूण 3 लाख 56 हजार दोनशे पन्नास किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक  आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक पवन मुळे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान भाग्यश्री शेरखाने व गणेश रोडे  यांच्या  पथकाने पार पाडली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात अवैध दारुविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत जिल्हाभरात एकूण 116 गुन्हे नोंदविले असून 127 आरोपींना अटक केली आहे तसेच 26 वाहनेही जप्त केली आहेत. या कालावधीत विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

*आवाहन*

नाताळ सण व नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाईकरिता 6 पथके नेमण्यात आली असून कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments