पंढरपूर प्रतिनिधी
विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे मंगळवेढा तालुक्यातील १८ पैकी १० ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थावर आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या विचारांच्या भारतीय जनता पार्टी (आ.आवताडे गटाने) नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
आमदार महोदय यांच्या नेतृत्वाखाली पक्षास मिळालेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आमदार मा. दादासाहेब यांचे भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालय नागपूर येथे विशेष अभिनंदन केले..
यावेळी भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार मा. सचिन दादा कल्याणशेट्टी, संघटन सरचिटणीस मा. शशिकांत नाना चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments