LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महापुरुषांच्या बदनामी विरोधात पंढरपूर बंद ची हाक.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथे आज सोमवार दि 19डिसेंबर रोजी    सर्वपक्षीयांकडून महापुरुषांबाबत होत असलेल्या बदनामीच्या विरोधात पंढरपूर बंदची हाक देण्यात आली होती. या मध्ये सर्व पक्षातील नेते मंडळींनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला सतत होत असलेल्या महापुरुषांच्या अवमान  करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आणि मंत्री चंद्रकांत पाटील  तसेच आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपली आपापली मते मांडली आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली सतत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्या ची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांची पदावरून अक्कलपट्टी बीजेपी ने ताबडतोब करावी असे मत मोर्चास आलेल्या वक्त्यांनी व्यक्त केली 

 महात्मा फुले यांच्या  पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात झाली. व पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मोर्चातील सहभागी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पोलीस प्रशासन व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली आज सोमवारी पंढरपूर येथे सफला एकादशी होती, मात्र शहरातील सर्व दुकाने, आस्थापना,हॉटेल्स, रेस्टॉरट्स बंद असल्याने परगावीहून येणाऱ्या हजारो भाविकांचे हाल झाले,

Post a Comment

0 Comments