LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चिंचणी येथे हुरडा पार्टी, रस गुऱ्हाळ सुरू.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)चिंचणी ता. पंढरपूर हे माढा विधानसभा मतदासंघातील एका टोकावरील व सातारा जिल्ह्यातील कन्हेर प्रकल्पातुन येऊन पुनर्वसन झालेले गाव. 


जेमतेम साठ कुटुंबे व प्रत्येक कुटुंबाला दोन एकर जमीन असलेल्या या गावातील लोकांनी एकत्र येऊन पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या एकीला बळ देण्यासाठी  माढा विधानसभा मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार बबनराव शिंदे साहेब यांनी साथ दिली. लोक सहभाग, आमदार निधी,राज्य सरकारच्या विविध योजनांमधून लाखो रुपयांचा निधी मिळवुन दिला. याचबरोबर विविध सामाजिक संस्था, सोलापूर येथील प्रिसिजन कंपनी, सोलापूर सोशल फाऊडेशन, रोटरी क्लब पंढरपूर, फेसबुक फ्रेंडस फाउंडेशन यांचाही सहयोग मिळत असल्याने आज चिंचणी जिल्ह्याच्या नकाशावर येत आहे. आ. बबनदादा शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील पहिले क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून शासनाची मंजुरी मिळवून दिली पहिल्या वर्षी तीस लाख रुपये निधी दिला त्यामधून विविध कामे झाली. चालू वर्षीही  या गावासाठी नव्वद लाख रुपये मंजूर केले असून त्यातून नाना-नानी पार्क, स्विमिंग पुल, बोटिंग साठी बंधारा बांधणे ही कामे होणार आहेत आज मॉडेल गाव म्हणून चिंचणीची ओळख होत आहे.


चिंचणी मध्ये आजपासून पर्यटकांच्या सोयीसाठी नव्याने हुरडा पार्टी,उसाचा रस  याची सुरुवात ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे (दादा) व सौ.सुनंदाताई बबनराव शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी आ. दादांनी गावातील कामाची पाहणी करून ग्रामस्थ, जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व येणाऱ्या काळात गावातील प्रत्येक व्यक्तीला गावातच रोजगार उपलब्ध मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

 

याप्रसंगी गावासाठी तळमळीने काम करणारे मोहन अनपट, महादेव सावंत, माचिंद्रनाथ पवार, तुकाराम जाधव, तुकाराम घोरपडे, अशोक जाधव, राजाराम अनपट, सदाशिव सावंत, जगन्नाथ सावंत, शरद सावंत, मुक्ताबाई सावंत, दिक्षा अनपट, सविता सावंत, कस्तुरा सावंत, वैशाली सावंत, मिना सावंत यांचेसह सर्व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments