पोलिस प्रशासन मात्र सुस्त.
पंढरपूर / प्रतिनिधी – पंढरपूर हे राज्याचे आराध्य दैवत असून या ठिकाणी राज्य तसेच परराज्यातून हजारो भाविक श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरिता येत असतात. त्याचबरोबर चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास अनन्य साधारण असे महत्त्व असल्याने भाविक या ठिकाणी स्नान करण्याठी जाताना आपले कपडे चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंट येथे जवळपास ठेवतात व स्नान करुन परत आपले कपडे ठेवलेल्या ठिकाणी परततात. परंतु त्या ठिकाणी त्यांना ठेवलेले कपडे व कपड्यातील मोबाईल व पैसे चोरी झाल्याचे लक्षात येते. असा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागा नदी पात्रातील वाळवंटामध्ये अनेक वारकऱ्यांंबरोबर झालेला आहे .
काही विशिष्ठ समाजाच्या टवाळ व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांची वाळवंट परिसरात दादागिरी सुरू असते. कपडे सुकविण्याच्या बहाण्याने नजरेसमोर साडी, धोतर धरून चोऱ्या केल्या जात आहेत.
दर्शनाकरिता आलेल्या भाविकांनी शहरातील पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहन पार्किंग केलेली असतात. त्या वाहनांमधूनही पैसे, पर्स,मोबाईल किंवा किमती साहित्य चोरीच्या घटना पंढरपूर शहरामध्ये घडत आहेत.भाविकांच्या वस्तूंच्या होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस शहरामध्ये वाढत आहे त्यामुळे पंढरपूर शहराची बदनामी होत आहे.पंढरपूर शहर पोलीस ठाणे चोरीच्या अशा घटनांना पायबंद घालण्यास कमी पडत आहे का ? त्यामुळे याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन या चोरांना पकडुन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.


0 Comments