पंढरपूर प्रतिनिधी : -
हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील गाताडे प्लॉट येथे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अमृताताई लंकेश बुराडे यांच्या नेतृत्वाखाली मकर संक्रांतीनिमित्त भव्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन जुना कराड नाका, गाताडे प्लॉट, लॉ.कॉलेज जवळ उदयिक दिनांक २३ जानेवारी २०२३ सोमवार दुपारी ५:३० वा केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध व्याख्यात्या डॉ.सौ. मैत्रेयीताई मंदारजी केसकर यांच्या अध्यक्षतेखाली तर सौ. संगीताताई कल्याणराव काळे, सौ. सुमित्राताई अभिजीत ( आबा ) पाटील, सौ. प्रणिताताई भागीरथदादा भालके, सौ.अमृताताई प्रणवदादा परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सौ.अमृताताई लंकेश बुराडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, कार्यक्रमांमध्ये हळदी कुंकु, वाण वाटप व तिळगुळ वाटप केले जाणार असून विविध क्षेत्रात कर्तव बजावणाऱ्या महीला भगिनींचा सन्मान ही करण्यात येणार आहे, तरी सर्व स्तरातील महीला भगिनीं यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सौ.अमृताताई लंकेश बुराडे यांनी केले आहे.
0 Comments