पंढरपूर (प्रतिनिधी)
भीमा सह साखर कारखान्यांचे माजी अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसा निमित्त कारखाना कार्यस्थळावर मंगळवार ता २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भव्य निकाली कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील मातब्बर पैलवानांची उपस्थिती राहणार आहे. या कुस्त्या आखाड्यात जवळपास ९ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिली. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार भीमा केसरी किताब साठी पैलवान सिकंदर शेख (महान भारत केसरी) पै. भूपेंद्रसिंग अजना ला (पंजाब केसरी), भीमा साखर केसरी या किताब साठी पै.माऊली जमदाडे (महान 'भारत केसरी) पै.बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी), भीमा कामगार केसरी या किताब साठी पै.गणेश जगताप ( मुंबई महापौर केसरी) पै. अक्षय शिंदे, भीमा वाहतूक केसरी या किताबा साठी पै.महेंद्र गायकवाड (विदर्भ केसरी) पै.गोरा अजनाला (पंजाब) (युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल चॅम्पियन), भीमा सभासद केसरी या किताब साठी पै. अक्षय मंगवडे (नॅशनल गोल्ड मेडलीस्ट) पै.संतोष जगताप (वस्ताद दत्ता वाघमारे) अकलूज अशा भीमा केसरी भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भीमा केसरी भव्य कुस्ती स्पर्धेसाठी वस्ताद म्हणून पै. दीनानाथ सिंग (हिंद केसरी) पै. राम सारंग ( राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते ) पै. अफसर शेख (ऑल इंडिया चॅम्पियन), पै. रावसाहेब मगर, पै. छोटा रावसाहेब मगर (महाराष्ट्र केसरी) पै. मुन्नालाल शेख ( महाराष्ट्र केसरी), पै.समाधान घोडके (महाराष्ट्र केसरी), पै. मौला शेख (उप- महाराष्ट्र केसरी), पै. योगेश बोंबाळे (महान भारत केसरी), पै. भरत मेकाले (उप- महाराष्ट्र केसरी), पै. अन्सार शेख (महाराष्ट्र चॅम्पियन), पै. सर्जेराव चवरे ( सोलापूर जिल्हा तालीम उपाध्यक्ष), पै. कुस्ती सम्राट अस्लम काझी, पै. भिवा शेंडगे, पै. समाधान पाटील (मुंबई महापौर केसरी), पै. आसिफ शेख (सोलापूर केसरी), पै. महादेव चव्हाण सुस्ते, पै. सत्यवान घोडके, पै. समाधान लोमटे, पै. जमीर मुलाणी, पै. विलास तिरवे, पै. आण्णा शेंडगे, पै. आबादेव पुजारी, पै. चंद्रकांत काळे, पै. मारुती माळी, पै. महेंद्र देवकते, पै. भिमराव मुळे, पै. गणेश वाघमोडे, पै. सिद्राम मदने, पै. संजय बाबर, पै. सुधाकर गायकवाड, पै. महादेव येळे हे प्रमुख वस्ताद उपस्थित राहणार आहेत. कुस्ती स्पर्धेच्या नाव नोंदणी साठी पै. शरीफ शेख ९९२१७४५५७७/८०८०९०१०३१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन भीमा परिवारा कडून करण्यात आले आहे. या निकाली कुस्त्यासाठी निवेदक म्हणून धनाजी मदने, अशोक धोत्रे हे काम पाहणार आहेत.
0 Comments