LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सौ. लता माने यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान

मंगळवेढा (प्रतिनिधी): राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम फाऊंडेशन मंगळवेढा यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये मंगळवेढा येथील श्रीराम सर्वधर्म वधु वर सुचक केंद्रच्या संचालिका सौ. लता मनोहर माने यांना भारत भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

सौ.लता माने यांनी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत. श्रीराम सर्वधर्म वधू वर मार्फत विधवा, अपंग,विधुर यांची तळमळीने लग्न जमवणे तसेच त्या संत निरंकारी मंडळ मध्ये महिलांच्या प्रमुख असून, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यामाध्यमातून त्या कार्यात सहभागी असतात. तसेच कल्पतरू भजनी मंडळ व विविध कलागुणांचे कार्यक्रम घेणे, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे यासारख्या अनेक सामजिक कार्यात त्या अग्रेसर असतात.त्या सर्व गरजू व गरीब यांच्या मदतीसाठी कार्यशील असतात. 

सौ.लता माने यांच्या सामाजिक कार्याचा गेल्या दहा वर्षाचा आढावा घेऊन माहिती सन 2023 चा भारत भूषण पुरस्कार देण्यात आला. लोकप्रिय बहुउद्देशीय संस्था या माध्यमातून त्यांनी हळदीकुंकू समारंभ महिलांना प्रोत्साहन देणे व त्यांना आदर्श समाजसेविका म्हणून पुरस्कार देण्यात आला आणि रागिनी पुरस्कार हिरकणी पुरस्कार व असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले 

Post a Comment

0 Comments