पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
पंढरपूर प्रतिनिधी,
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि दुकानफोडी सारख्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.
याच पद्धतीने दिनांक 22जानेवारी 2023 रोजी चोरट्यांनी पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावातील पांडुरंग कृषी केंद्र या दुकानाचे कुलुप तोडून दुकानातील रोख रक्कम 42000 हजार रुपये तर तननाशके कीटकनाशके जवळपास तीस हजार रुपये किमतीची तसेच सोमनाथ जनरल स्टोअर्स मधून रोख रक्कम 6000 व काही खाद्यपदार्थ तसेच चैतन्य पशुखाद्य कौठाळी येथून रोख रक्कम 13500 रुपयांची चोरट्यांनी चोरी केली आहे.
सदर चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या हि चोरी झाल्याने कौठाळी गावातील नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घातली पाहिजे पण ती घातली जात नसल्याचे नागरिकांच्या कडून चर्चिले जात आहे.
0 Comments