LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री पांडुरंग साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्राप्त.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम साखर कारखाना अशी ख्याती असणाऱ्या श्रीपुर येथील

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु. ॥ पुणे यांनी हंगाम २०२१_२२ मधील कामगिरीसाठी आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील या नावाने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार त्याच बरोबर कारखान्याचे केन मॅनेजर श्री संतोष कुमठेकर यांना उत्कृष्ट शेती अधिकारी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच या समारंभात नॅशनल फेडरेशन दिल्ली यांच्याकडूनदेशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कारही मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार माझ्यासह पांडुरंग चे व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, दिनकर मोरे व सर्व संचालक अधिकारी यांनी स्वीकारला.ऊस विकास विभागाचे कार्य उल्लेखनिय असलेमुळेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु. ॥ पुणे यांचा आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे.श्री पांडुरंग कारखाना हा नवनविन यशाची शिखरे पार करीत असताना कारखाना राबवित असलेल्या शेतकरी हिताच्या योजना व त्याची ऊस उत्पादक शेतकरी करीत असलेले काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळेच कारखान्याची प्रगती होत आहे. कारखान्याने नेहमीच सुधारीत ऊस वाणांची निवड करुन लागवड करुन ऊस उत्पादकास व कारखान्यास जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळवून आर्थिक फायदा केला आहे. त्यामुळेच कारखाना जिल्ह्यात सर्वाधीक ऊस दर देत आहे. कारखाना श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांनी घालुन दिलेला आदर्श पुढे चालवित असून शेतकरी, कामगार यांचे हित जोपासत आहे. कारखाना शेतकऱ्यांची नियमीतपणे ऊस बिले,कामगारांचे पगार, व्यापाऱ्यांची देणी वेळेवर देत आहे.कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बु. ॥ पुणे याचा ऊस विकास व संवर्धन पुरस्कार मिळालेबद्दल कारखान्याचे सर्व अधिकारी, स्टाप यांचे अभिनंदन करुन पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments