पंढरपूर --प्रतिनिधी काणेज् गायत्री सुपर स्पेशालिस्ट हाँस्पीटल येथे महीला व पुरुष यांची मोफत कँन्सर शिबिराचं आयोजन रविवार दि.२२ जानेवारी रोजी करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लक्ष्मी टाकळीच्या सरपंच सौ. विजयमाला वाळके तसेच सिध्देश्वर कँन्सर हाँस्पीटल चे डॉ. अवधुत डांगे, भारत विकास परिषद चे अध्यक्ष डॉ. सुरेद्र काणे व सर्व सभासद आणि ईनरव्हिल क्लब चे अध्यक्ष सौ. वैशाली काशीद व सर्व सभासद उपस्थित होते .
निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत सुधारणा झाली पाहिजे प्रसन्न व आरोग्यदायी जीवनशैली साठी स्वतः शरीराची काळजी घेणं तसेच उत्तम व्यायाम, सर्वात महत्त्वाचे वजन नियंत्रित असणे त्याच बरोबर योग्य आहार असणं गरजेचं आहे याच बरोबर नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ डांगे यांनी केले..
यावेळी कार्यक्रमात सहभागी व्यक्तींना पॅस्पमिअर टेस्ट फ्री असून याद्वारे महिला वर्गात विविध कारणांमुळे कॅन्सर व इतर आजार होऊ नये तसेच तपासणीत योग्य पद्धतीने उपचार सुरू करता येईल कॅन्सर या रोगांचे जनमानसात भिती आहे ती दुर व्हावी यासाठी डॉ वर्षा काणे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात १५० हुन अधिक लोकांनी नावनोंदणी केली असून सहभागी व्यक्तींना उपचारासाठी लागणार्या सेवा सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल असे ते म्हणाले.
पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांसाठी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर त्याचबरोबर या शिबिरामध्ये पॅस्पमिअर टेस्ट मोफत केली जाणार. यावेळी डॉ सुरेंद्र काणे बोलताना पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, भारत विकास परिषद, डॉक्टर काणे मेडिकल असोसिएशन पंढरपूर व सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या विद्यमाने मोफत मार्गदर्शन तसेच कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजित केले आहे.यामध्ये महिला व पुरुष यांना कॅन्सर पासून कशा पद्धतीने बचाव करता येतो याचे मोलाचे मार्गदर्शन केले
या शिबिराचे आयोजन डाँ. सुरेद्र काणे व वर्षा काणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मैथीली केसकर यांनी केले तर आभार श्री. मिलिंद वाघ यांनी मानले.
0 Comments