LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बालकाच्या क्रूर हत्येने पंढरपूर हादरले.

 


पंढरपूर ( प्रतिनिधी)पंढरपूर येथील संत पेठ भागातील एका सार्वजनिक शौचालयात केवळ नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाचा मृतदेह आढळला या भयानक घटनेने पंढरपूर शहर हादरून गेले आहे.

या संतापजनक, क्रूर हत्येने पंढरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, संत पेठ भागात तिम्मा पांडुरंग धोत्रे (वय ३८ ) यांचे घर असून कृष्णा तिम्मा धोत्रे हा नऊ वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला.

सोमवारी पहाटे या परिसरातील लोक सार्वजनिक शौचालयात गेले असताना, कृष्णा याचा मृतदेह आढळला.या मुलाच्या गळ्यापासून बेंबी पर्यंतचा भाग गायब आहे, पहाटे मोबाईल फोन च्या बॅटरीत महिलांना सर्वात आधी लहान मुलाचा मृतदेह आढळला.या मुलाचे अवयव काढून घेतले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या गजबजलेल्या भागात ही हत्या झाली कशी? याचे गूढ वाढले असून पोलिस कसून चौकशी, तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments