LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय मराठा महासंघाचे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

 


आखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर महीला व युवती ,तांबट धर्मशाळा पंढरपूर येथे हळदी- कुंकू ,तिळगुळ वाटप कार्यक्रम  आयोजित करण्यात आला.यावेळी मान्यवर मा.प्रेमलताताई बब्रुवान रोंगे,मा.सिमाताई प्रशांत परिचारक,मा.अंजलीताई समाधान आवताडे,मा.सुमित्राताई अभिजित पाटील मा.राधिकाताई अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, मा.स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमा पुजन करण्यात आले.

तसेच यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्या  अर्चनाताई चव्हाण(सुस्ते) आणि ज्योती विलास शिंदे (भोसे) या महिलांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष मा.अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने महिलांची व युवती पदनिवड कार्यक्रम करण्यात आला.

पदनिवड - आखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्षा म्हणुन प्रभावतीताई गायकवाड ,महिला तालुकाध्यक्ष-रतनताई थोरवत ,तालुका उपाध्यक्ष- अर्चनाताई चव्हाण,उपाध्यक्ष-वर्षाराणी गुटाळ ,तालुका संघटक विजयाताई ,सचिव-ज्योतीताई शिंदे तसेच शहराध्यक्षपदी -डाॅ.संगिताताई पाटील ,शहर उपाध्यक्ष- आश्विनीताई साळुंखे,

शहरखजिनदार -तनुजाताई नाईकनवरे,शहर कार्यध्यक्ष -वैशालीताई थिटे,शहर सचिव-स्वप्नाली साळुंखे, आणि आखिल भारतीय मराठा महासंघ युवती जिल्हाध्यक्ष म्हणुन अॅड.प्राजक्ता शिंदेयांची निवड करण्यात आली.यावेळी कायदेशीर माहीतीपर व्याख्यान अॅड.घाडगे यांनी दिले,नैसर्गिक संदेश देत तुळशीची रोप देऊन सन्मान करण्यात आले.या या प्रसंगी -सिमाताई परिचारक यांनी महिला सक्षम झाल्या पाहिजे ,समाजात एक आदर्श घडवणार्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे यायला हवं असे मनोगत व्यक्त केले तर अंजलीताई आवताडे यांनी निवड झालेल्या आणि आदर्श महिलांना सन्मान केल्याबद्दल  अभिनंदन केले व स्त्री सक्षमीकरण प्रोत्साहन दिले.तसेच या कार्यमाची प्रस्तावना -प्रभावती गायकवाड,आभार -डाॅ.संगिता पाटील यांने मांडले.याप्रसंगी आखिलभारतीय मराठा महासंघ मैनाताई गंगथडे,मोनालीताई निंबाळकर, अर्चनाताई गायकवाड स्नेहलताई पवार,प्रियंका ताई गाडेकर तसेच सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments