पंढरपूर (प्रतिनिधी) अतिवृष्टी तसेच गारपीट,वादळ यांमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत,आढावा घेत आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आधार दिला….
मागच्या २-३ दिवसांत झालेली अतिवृष्टी व काल झालेली अस्मानी गारपीट, वादळ यांमुळे मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,गोपाळपूर तसेच इतर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बाग, फळबागा व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.
मतदारसंघाचे संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार श्री.समाधान आवताडे यांनी शेतकी, प्रशासकीय अधिकारी वर्गाला सोबत घेऊन तातडीने नुकसानीचा आढावा घेतला तसेच तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या…..
पंढरपूर तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्षात पाहणी करत राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना दिला….
गारपिटीच्या अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला जगण्याच सामर्थ्य देणारा आणि आश्वस्त करणारा मायेचा आधार आपल्या सरकारकडून मिळवून देणे हीच माझी प्राथमिकता असेल हा शब्द देत झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना आधार देत संवेदनशील आमदार समाधान दादांनी धीर दिला….
यावेळी नुकसानीचा आढावा घेण्याकरिता,पंचनामे करण्याकरिता संप पुकारलेला असूनही मतदारसंघातील ग्रामसेवक तलाठी तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग पंचनामा ,नुकसान पाहणी करिता आमदार साहेबांसमवेत उपस्थित राहिले,शेतकरी कष्टकरी मायबापांप्रती असणाऱ्या या संवेदनशीलतेबद्दल ही आमदार साहेबांनी अधिकारी वर्गाची दखल घेतली व तात्काळ पंचनामे करून शासनस्तरावर सुपुर्द करावेत या सुचना केल्या.


0 Comments