LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निर्भीड स्पेशल : द्राक्षायन भाग ३

पंढरपूर शहरात आता शासकीय अधिकारी व पत्रकार यांच्यातील शीतयुद्ध चांगलेच रंगलेले दिसून येत आहे. मंदिर समितीचा स्वच्छ? कारभार ठाऊक असणारे पत्रकार आता नेमके मर्मावर बोट ठेवून प्रश्न विचारीत आहेत. त्यामुळे जाम गोची होत आहे. द्राक्ष वाटपाचे फुटेज दाखवून किती केविलवाणा प्रयत्न समितीने केला,हे सर्वांनीच पाहिले. कर्मचारी आता स्वतः ला मालक समजत असून अनेक ठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे. 

समिती सदस्य असणाऱ्या काही लोकांचे पुतणे, भाचे वशिल्याने नोकरी करत असून सेवा देण्यापेक्षा नुसत्या उचापती करून वरची कमाई कशी होईल इकडेच त्जायांचे जास्त लक्ष असते,

एक गोष्ट लक्षात येत नाही, ती म्हणजे, गैरकारभार होत नसेल तर मग तडकाफडकी ४४ कर्मचाऱ्यांची बदली का करण्यात आली.पुढे या बदल्या नियमित व प्रोटोकॉल नुसार झाल्या असल्याचे सांगण्यात आले.पण ,ये  जो पब्लिक है,ये सब जानती है.हे त्रिकालाबाधित सत्य बहुतेक समिती सदस्य, अधिकाऱ्यांना माहीत नसावे. 

याठिकाणी विविध मार्गांनी पैसा लुटण्याचे मार्ग असून अनेकजण गबरगंड झालेले आहेत. काही कर्मचारी तर दररोज धाब्यावर जाऊन पार्ट्या झोडत असतात. मंदिर समितीला दान करण्यात आलेल्या जमिनी प्रकरणात काही लोकांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. या अधिकारी लोकांची संपत्ती,दागिने, बँक खाते,जमिनी यांची तपासणी करायला हवी , त्यामुळे आम्ही किती जरी स्वच्छ असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर त्यामध्ये मंदिर समितीचे कर्मचारी काही यश मिळवू शकणार नाहीत.

Post a Comment

0 Comments