गुरूवार दिनांक१६/०३/२०२३ रोजी मा. उपसभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य, शिवसेना उपनेत्या डॉ निलमताई गोऱ्हे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती विकास आराखडा व पंढरपूर प्रस्तापित कॅरीडोर व इतर सोई सुविधा निर्माण करण्यासंदर्भात विधान भवन मुंबई येथे आज दुपारी .०३.०० वाजता बैठक बोलविली होती. त्यानंतर त्यांनी पंढरपूरात भाविकांना आगमी काळात अतिशय सुविधाजनक असेल यावर लक्ष द्यावे अश्या सुचना अधिकाऱ्या दिल्या. त्याबद्दल श्री संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी श्री तुषार ठोंबरे यांच्या हस्ते डॉ. निलमताई गोऱ्हे यांचा सत्कार “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला. त्यावेळी आदित्य फत्तेपुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.


0 Comments