प्रतिनिधी
पंढरपूर -पंढरपूर येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतीमेस मंगळवार दि १८ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता जोडेमार आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले.
सध्या सोशल मीडियावर आणि टीव्ही वाहिन्यांवर भा ज पा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यामुळे भा ज प आणि सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
पंढरपूर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेचे जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते महीला आघाडी जिल्हा संघटिका पुनम अभंगराव , उप जिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, तानाजी मोरे, ईश्वर साळुंखे, राजू शिंदे, पोपट सावंतराव, रेहाना आतार, संगीता पवार, पूर्वा पांढरे, मंजुळा दोडमिसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments