LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आ. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

  


: पंढरपुरातील नगरपालिका शिक्षण मंडळ संचालित अविनाश विद्यालय शाळा क्रमांक १० येथे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांचे हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून, शाळेस ११ हजार रुपयांची रोख देणगी देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.न गरसेवक शैलेश बडवे, सत्यविजय मोहोळकर, ऍडव्होकेट प्रवीण मुळे, छावा संघटनेचे शहर अध्यक्ष सागर चव्हाण, केंद्र समन्वयक रामचंद्र बोडरे हे उपस्थित होते. 

      यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक यांनी समाजसेवक विशाल आर्वे आणि अनिकेत देशपांडे यांनी आयोजित केलेल्या या विधायक उपक्रमाची प्रशंसा केली. शिक्षकांशिवाय देश घडणे अशक्य असल्याचे सांगत नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. पंढरपुरातील नगरपालिकांच्या शाळांना मदत करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे असे यावेळी बोलताना उमेश परिचारक म्हणाले. कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावण्यापेक्षा अशा शाळांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तर या शाळांमधील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करीत त्यांना घडिवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे सांगितले. अविनाश विद्यालयाच्या वाढीव वर्गखोल्या आणि इतर साधनांसाठी प्रस्ताव द्या निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. 

               यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन शिंदे, राहुल गोफणे, सुनील सावंत, गुरूशांत आळंद, सौ.चित्रवंदा पाटील मॅडम आदी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारंग दिघे, किशोर काकडे, अरविंद गुंड, संतोष टंकसाळे आदींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments