वागदरी (ता. अक्कलकोट)आज दी.11सप्टेबंर2023 रोजी येथे नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका आणि वागदरी नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वागदरी येथील नाभिक भूषण सन्माननीय बाबू अण्णा सुरवसे यांच्या शुभ हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. पूजेचे मानकरी म्हणून यावर्षी श्री बाबू अण्णा सुरवसे यांना श्री यशवंत सुरवसे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पांडुरंग सुरवसे, यशवंतअण्णा सुरवसे, अजय सुरवसे, नामदेव सुरवसे, नागेश सुरवसे, गजानन सुरवसे, नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष संजय सुरवसे, शरण भाले, मल्लू सुरवसे, बाळू शिंदे, महाराष्ट्र एसटी महामंडळाचे निवृत्त कंट्रोलदार शिवाजी सावंत साहेब, रतन जाधव,निंगपा कोरे,चि.अनंत सुरवसे, चि.दीपक सुरवसे,महादेव सोनकवडे,सुनील सावंत,राम पोमाजी, हनुमंत चौगुले, समस्त नाभिक समाज बांधव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments