LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

डॉ किरण बहिरवाडे यांच्या हातून उत्तम रुग्णसेवा घडावी. डॉ, तात्याराव लहाने

 


प्रतिनिधी. पंढरपूर -  पंढरपूर येथील डॉ किरण बहिरवाडे यांच्या हॉस्पिटल चे आज उद्घाटन आहे, ते नुसते डॉकटर नाहीत तर हजारो शस्त्रक्रिया केलेले निष्णात सर्जन आहेत. त्यांच्या हातून उत्तम रुग्णसेवा घडावी. असे प्रतिपादन  मुंबई येथील रघुनाथ नेत्रालय चे प्रमुख ,पद्मश्री, डॉ तात्याराव लहाने यांनी केले.

पंढरपूर येथे गौरी नेत्रालय, या डॉ किरण बहिरवाडे यांच्या  डोळ्यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार दि.१० सप्टेंबर रोजी  करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. प्रशांत परिचारक, प्रा. विनायक परिचारक, डॉ दीपक अचालारे, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक किसन सर वदे, प्रा.राजेंद्र  पाराध्ये,डॉ  एकनाथ बोधले, डॉ गणेश बहिरवाडे,डॉ किरण बहिरवाडे, डॉ बजरंग धोत्रे, सोलापूरचे नगरसेवक अनिल गवळी, सहायक संचालक, कॉटेज हॉस्पिटल मोहन शेगर आदी मान्यवर उपस्थित होते. 

सुरुवातील दीप प्रज्वलन करून नूतन हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना, डॉ लहाने म्हणाले, पंढरपूरच्या श्री विठ्ठलावर फार विश्वास आहे. डॉ किरण बहिरवाडे यांच्याकडून सर्व रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, ही सदिच्छा,ते केवळ पदवी घेतलेले डॉक्टर नाहीत तर हजारो शस्त्रक्रिया केलेले अनुभवी डॉकटर आहेत. आजकाल डोळ्यांच्या आजारात वाढ होत आहे, कारण आपण मोबाईल चे गुलाम झालो आहोत. 

मोबाईल फोन वापराने आपण अनेक कृत्रिम आजार घेत आहोत. तीस सेकंदाच्या वर मोबाईल वापरू नये. जास्त वेळ मोबाईल वर बोलणाऱ्या लोकांची गालाची कातडी जळून जात आहे. मेंदूतील रक्त वाहिन्या फुगून ब्रेन ट्युमर, मेंदूचा कॅन्सर, नपुसंकत्व येण्याची शक्यता असते. मुलांना मोबाईल देऊ नये, त्यांचा स्क्रीन टाईम किती आहे? हे  तपासावे.

 यावेळी प्रा. विनायक परिचारक  म्हणाले, बहिरवाडे या दोन्ही बंधूची परिस्थिती बिकट होती, पण त्याचे कधी भांडवल केले नाही. प्रचंड नम्रता,स्वाभिमान जपत विविध कष्ट घेऊन मेरिट मध्ये आले. आज दोन्ही बंधू डॉक्टर आहेत. थोरले बंधू गणेश यांनी एस टी डी सेंटर मध्ये काम केले. गणेशने मेरिट वर मेडिकल मध्ये प्रवेश मिळविला. त्याची प्रेरणा किरण ने घेतली.

हे आयुष्य म्हणजे श्री जगन्ना थाचा रथ आहे, जो ओढतो तो पुढे जातो. किरण याचे नशीब थोर आहे साक्षात परब्रम्ह पांडुरंगाने त्याच्या गळ्यात माळ घातली आहे. 

यावेळी डॉ किरण बहिरवाडे म्हणाले, आम्ही मोठे होण्यात बरेचसे हात आहेत. विवेक वर्धीनी विद्यालय हे आमचे घरचं आहे. विनायक परिचारक सराचे उपकार कधीच विसरणार नाही. कष्ट आणि बुध्दीमत्ता याला  सरांकडे वाव असतो.

प्रमुख पाहुणे डॉ लहाने यांचा परिचय डॉ गणेश बहिरवाडे यांनी करून दिला.

यावेळी दोन्ही डॉ. बंधूंच्या मातोश्री सुमनताई बहिरवाडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. 

पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक श्री किसन सरवदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे निवेदन श्रीकांत महाजन बडवे यांनी केले.

डॉ गणेश बहिरवाडे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ मैत्रेयी केसकर यांनी सूत्रसंचालन केले तर अमर चव्हाण यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास पंढरपूर येथील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments