LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेतील मिळवलेल्या यशाबद्दल प्रणिता संजय सुरवसे हीचा सोलापूर येथे सत्कार

 


निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर. येथे वीर कोतवाल शिक्षण संस्था, सोलापूर. यांच्या वतीने नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच उल्लेखनीय कार्य करून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वागदरीचे  नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष संजय सुरवसे यांची कन्या  श्री एस. एस शेळके प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय,वागदरी येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेले नाभिक कन्या कुमारी प्रणिता संजय सुरवसे हिने तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत १९वर्षे वयोगटामध्ये उंच उडी या क्रीडा स्पर्धेत अक्कलकोट तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावले. त्याबद्दल  सन्मानचिन्ह, आणि सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच इयत्ता दहावी 74 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी वीर कोतवाल संस्थेचे सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी विर कोतवाल शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवराच्या शुभ हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments