शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवक शहराध्यक्ष संदिप शिंदे यांचे आंदोलन
पंढरपूर-
विद्यमान भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी रोजगार देणे सोडा आहे ते रोजगार युवकांच्या हातातून काढून घेण्याचे काम केलेले आहे. जीएसटी व नोटा बंदीच्या निर्णयामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांना यावी म्हणूनच बेरोजगार दिवस साजरा करत युवक कॉंग्रेसने पंढरपूरात अनोखे आंदोलन करत नागरिकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. सदरचे आंदोलन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले, प्रदेश कार्याध्यक्षा आ.प्रणितीताई शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या पाटील, महिला नेत्या सुनेत्राताई पवार, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदिप शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखे आंदोलन करत भाजप सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
यावेळी भाजप सरकारने 10 वर्षात दिले काय लॉलीपॉप लॉलीपॉप, भाजप हटाव देश बचाव, महागाईच्या जमान्यात स्वस्तातील 1 रूपयात चहा विकून बेरोजगारी कमी केली, मोदी तेरे राज युवा गये जेल में, बेरोजगार बोले हॅलो हॅलो मोदी बोले भजीया तलो अशा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी माजी नगरसेवक किरणराज घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, जिल्हा सचिव राजू उराडे, सेवा दल अध्यक्ष गणेश माने, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अश्पाक सय्यद, वरिष्ठ शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, मिलिंद अढवळकर, देवानंद इरकल, राजेंद्र गोळे, शशिकांत चंदनशिवे, शिवकुमार भावलेकर, संतोष हाके, द.बडवे, महेश अधटराव, बाळासाहेब लोकरे यांच्यासह कॉंग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments